मुंबई

चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक

CD

चांगला परतावा देण्याच्या प्रलोभनाने फसवणूक
वांद्र्यात व्यावसायिक बहीण-भावाविरुद्ध गुन्हा

अंधेरी, ता. २० (बातमीदार) : चांगला परतावा देण्याच्या प्रलोभनाने एका दाम्पत्याची सुमारे अडीच कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरातून उघडकीस आला आहे. याप्रकरणी मणीगंधन मंजुनाथन आणि प्रेमाराणी मंजुनाथन या व्यावसायिक बहीण-भावाविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
५१ वर्षांची तक्रारदार महिला वांद्रे येथे राहते. तिचे पती एका खासगी कंपनीत कामाला होते. दरम्यान, कोरोनामुळे त्यांची नोकरी गेली होती. त्यामुळे ते नवीन नोकरीच्या शोधात होते. २०२१मध्ये त्यांची मणीगंधनशी ओळख झाली. त्याने त्याचा रियल इस्टेटसह फॉरेक्स ट्रेडिंगचा व्यवसाय असल्याचे सांगून ते फिनटेक तज्ज्ञासह लंडनमधील एका खासगी कंपनीचे संस्थापक असल्याचे सांगितले होते. त्याने तिच्या पतीला सल्लागार म्हणून कामावर ठेवले होते. याच दरम्यान त्याने त्यांना कंपनीत गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्याने त्यांच्यासह इतरांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांनी गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळत होता. तक्रारदार महिलेसह तिच्या पतीने मिरा रोड येथील फ्लॅटची विक्री करून तसेच बचतीच्या एक कोटी ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना एक कोटी ३० लाख रुपये परतावा मिळणे अपेक्षित होते. मात्र मणीगंधन आणि त्याची बहीण प्रेमाराणी यांनी त्यांची फसवणूक केली होती. चौकशीदरम्यान कंपनीकडे वैध परवाना नव्हता. हा प्रकार लक्षात येताच या महिलेने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS, T20 WC: आराsssssरा खतरनाक! ग्लेन मॅक्सवेलचा रिव्हर्स स्विप अन् पथूम निसंकाचा चपळ झेल; सर्वोत्कृष्ट कॅच Video

Faridabad Factory Fire : 'केमिकल ड्रम्स'चे स्फोट झाल्याने फॅक्टरीत भीषण अग्नितांडव!, दोन पोलिसांसह ३५ जण होरपळले

Latest Marathi News Update : भाजपला उघडे पडणारच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

ILS Law College Fee Case : शुल्क परताव्याबाबत राज्य सरकारने दोन महिन्यांत निर्णय घ्यावा; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT