मुंबई

सांस्कृतिक कार्यक्रमांनी पहिल्या प्रवाशांचे होणार स्वागत

CD

सांस्कृतिक कार्यक्रमांनी पहिल्या प्रवाशांचे स्वागत
अदाणी समूहातर्फे नवी मुंबई विमानतळावर जय्यत तयारी

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २० : देशातील पहिले ग्रीनफिल्ड (हरितपट्टा विमानतळ) असणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाताळ सणाच्या दिवशी प्रत्यक्ष सुरू होणार आहे. बंगळूरहून नवी मुंबईला येणारे एअर इंडिगो कंपनीचे पहिले विमान सकाळी ८ वाजता विमानतळाच्या धावपट्टीवर उतरणार आहे. विमानातून बाहेर येणाऱ्या प्रवाशांचे विमानतळावर आल्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून स्वागत केले जाणार असल्याचे अदाणी एअरपोर्टसचे संचालक जीत अदाणी यांनी स्पष्ट केले.
२५ डिसेंबरला सकाळी ८ वाजता पहिले प्रवासी विमान धावपट्टीवर उतरणार आहे. तर ८.४० वाजता नवी मुंबईहून हैदराबादकरिता पहिले विमान उड्डाण करणार आहे. या दोन्ही विमानांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आठवणीत राहील, असे कार्यक्रमांनी स्वागत केले जाणार असल्याचे स्पष्टीकरण एनएमआयएने केले आहे. विमानतळ सुरू करण्यासाठी आवश्यक त्या खबरदारी विमानतळ व्यवस्थापनाद्वारे घेण्यात आल्या आहेत. विमानतळ सुरू करण्यापूर्वी ऑपरेशन रेडिनेस ॲण्ड एअरपोर्ट ट्रान्स्फर (ओआरएटी) या जागतिक स्तरावरील कार्यक्रमानुसार तयारी पूर्ण करण्यात आली आहे. विमानतळ प्रवाशांसाठी कार्यान्वित होण्यापूर्वी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, कर्मचारी आणि कार्यपद्धती यांच्या प्रत्यक्ष परिस्थितीमधील रंगीत तालीमद्वारे यशस्वी चाचणी एनएमआयएद्वारे घेण्यात आली आहे. एअरलाइन्स, सुरक्ष यंत्रणा, हवाई वाहतूक नियंत्रण विभाग, ग्राउंज हँडलर्स, आपत्कालीन सेवा, किरकोळ विक्री विभाग आणि विमानतळ कर्मचाऱ्यांनी तालीममध्ये सहभाग नोंदवला होता. या चाचणीदरम्यान एनएमआयएने प्रवासी म्हणून स्वतःचे कर्मचारी आणि त्यांच्या मित्रपरिवाराला प्रवासी म्हणून बोलावले होते. या वेळी सर्व कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवकांचा वापर करीत बोर्डिंग पास, सामान, चेक इन काउंटर, सुरक्षा तपासणी, बोर्डिंग्ज गेट्स, सामान हाताळणी प्रणाली आणि आपत्कालीन प्रतिसादाची चाचणी अशा चाचण्या पूर्ण क्षमतेने पूर्ण केल्या.
-----------------------------------------
प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
---------------------------------------------
स्थानिक खाद्यपदार्थांची दुकाने
विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याने जगभरातील विविध दर्जांची खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. परंतु या ठिकाणी नवी मुंबईतील आगरी-कोळी, महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख सांगणाऱ्या खाद्यपदार्थांची काही दुकाने उपलब्ध केली जाणार असल्याचे संचालक जीत अदाणी यांनी सांगितले.
-----------------------------------------------
तरघर रेल्वे स्थानकापासून शटल सेवा
उलवे आणि बेलापूर या दोन शहरांच्या अगदी मध्यभागी हे विमानतळ असल्याने अद्याप सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा सुरू झालेल्या नाहीत. परंतु जेव्हा विमानतळावर प्रवासी वाहतूक सुरू होईल त्या दिवशी तरघर रेल्वे स्थानकाहून विमानतळावर येण्यासाठी मोफत चार इलेक्ट्रिक बसद्वारे शटल सेवा सुरू केली जाणार आहे. या बस विमानतळावर कामाला येणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसहित प्रवाशांच्याही कामी येणार असल्याचे एनएमआयएने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT