मुंबई

अंगणवाडी सेविकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी

CD

बोईसरमध्ये अंगणवाडी सेविकांची दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
बोईसर, ता. २४ (बातमीदार) : एकात्मिक बालविकास विभाग पालघर, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाडी सेविकांसाठी आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. २३ व २४ डिसेंबर रोजी किराट आणि शिरगाव ग्रामपंचायत हॉलमध्ये झालेल्या या कार्यशाळेत मनोर प्रकल्पातील एकूण ८८ अंगणवाडी सेविकांनी प्रशिक्षण घेतले.
किराट ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजू सांबरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळेत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक, बौद्धिक, भाषा, सामाजिक, भावनिक आणि गणनापूर्व तयारी या सहा घटकांवर आधारित स्टॉल्स लावण्यात आले होते. आधारशिला आधारित व्हिडिओ, माता गटांचे डेमो आणि शैक्षणिक साहित्याचा प्रत्यक्ष वापर यावर सखोल चर्चा करण्यात आली. प्रथम संस्थेच्या श्वेता धोटे, प्रतीक खुंटे, मनीषा गावित आणि प्रणाली पडवळे यांनी मार्गदर्शन केले.
अंगणवाडी सेविकांच्या शैक्षणिक कौशल्यात वाढ करणे आणि बालविकासाची समज अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. "या प्रशिक्षणाने मुलांचे संगोपन, आरोग्य आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मोठी मदत होईल," असा विश्वास प्रशिक्षक प्रणाली पडवळे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

हा आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डेचा नवरा; या ठिकाणी दणक्यात पार पडणार लग्न; हास्यजत्रेच्या कलाकारांनी केली पोलखोल

Latest Marathi News Live Update : उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे गोंधळाची परिस्थिती

युद्धामुळे तांदूळ निर्यातीला फटका; विदर्भाचा बासमती अन् आंबेमोहोर अडकला बंदरात, भावही घसरले...

SCROLL FOR NEXT