मुंबई

बोईसरमध्ये फलक हटवण्यावरून वाद

CD

बोईसरमध्ये फलक हटवण्यावरून वाद
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर अरेरावीचा आरोप
बोईसर, ता. २४ (वार्ताहर)ः थकीत सदनिका मालमत्ता कर वसुलीसाठी नागरिकांना सवलत देण्याबाबत बोईसर ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव मंजूर केला होता. या ठरावानुसार थकबाकी रकमेवर ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती फलकांमधून देण्यात आली होती, पण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा फलक हटवल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
बोईसर पूर्व व पश्चिम भागातील थकबाकीदारांना निर्णयाची माहिती व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी फलकबाजी केली होती. ३१ डिसेंबरपर्यंत हे फलक कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच बॅनरवर ३१ डिसेंबरपर्यंत कोणतीही जाहिरात लावू नये, अशी स्पष्ट सूचनादेखील करण्यात आली होती. मात्र, बोईसर रेल्वे स्थानक परिसरातील ग्रामपंचायतीचे अधिकृत फलक हटवून शिवसेना बोईसर शहरतर्फे नवीन बेकायदा फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.
-----------------------------------
सदनिका मालमत्ता थकीत करावरील ५० टक्के सवलत देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्याबाबत सर्व थकबाकीदारांना कळावे म्हणून फलक लावण्यात आले होते. मात्र, ३१ डिसेंबर पूर्वीच फलकबाजी हटवून एखाद्या राजकीय पक्षांनी फलकबाजी करणे पूर्णपणे चुकीचे आहे.
- महेंद्र भोणे, बोईसर मंडळ अध्यक्ष, भाजप
ृ------------------------------
बोईसर ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप धोडी यांच्या वाढदिवसाचा फलक लावलेला होता. त्यांचा वाढदिवस पूर्ण झाल्यानंतर पक्षाच्या नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदनाचे फलक लावण्यात आले आहेत.
- अतुल देसाई, शिवसेना शहर प्रमुख, बोईसर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात 22 लाख कोटींचे नुकसान! सलग तिसऱ्या दिवशी बाजार लाल रंगात बंद; कोणत्या सेक्टरला फटका?

T20 World Cup : मोदीजी 'अपशकुनी'! ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनल अहमदाबादमध्ये नको, मुंबईत खेळवा...; कोणी केलंय हे वादग्रस्त विधान?

चित्रपटाला लाजवेल अशी कहाणी! पुण्यात घटस्फोटासाठी चक्क पत्नीने दिली पतीला पोटगी, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : जयदेव ठाकरे यांच्या अंगरक्षकाची बॅग आणि सरकारी पिस्तूलची चोरी

शाब्बास पठ्ठ्या... मॅच विनिंग खेळीचं संजू सॅसमनला मिळालं गिफ्ट, ICC ने केली मोठी घोषणा; अभिषेक शर्मासाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT