‘पेसा दिन’उत्साहात साजरा
बोईसर (वार्ताहर) ः पंचायतराज व्यवस्थेला बळकटी देत अनुसूचित क्षेत्रांतील ग्रामसभांना अधिकार मिळवून देणाऱ्या ‘पेसा अधिनियम १९९६’ च्या अनुषंगाने बोईसर ग्रामपंचायततर्फे पेसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा परिषद पालघर जिल्हा पेसा कक्ष (ग्रामपंचायत विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता. महसूल गाव बोईसर, काटकर आणि दांडी या गावांसाठी हा कार्यक्रम पार पडला. पेसा दिनानिमित्त ग्रामसभेचे अधिकार, ग्रामविकासातील सहभाग, स्थानिक स्वराज संस्थांची जबाबदारी, आदिवासी भागांच्या सशक्तीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास उपसरपंच नीलम संखे, ग्रामपंचायत सदस्य परशुराम दुमाड़ा, तेजस काठे, अजय ठाकूर, दशरथ सुतार उपस्थित होते.