मुंबई

कर्जत पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांची बदली

CD

कर्जत पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांची बदली
सहा महिन्यांतच उमेश पाटील नवे पोलिस निरीक्षक; प्रशासकीय निर्णयावर चर्चा
कर्जत, ता. २४ (बातमीदार) ः कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांची अवघ्या सहा महिन्यांच्या कार्यकाळानंतर प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी उमेश पाटील यांची कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप भोसले यांची बदली श्रीवर्धन पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, श्रीवर्धन येथे कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक उमेश पाटील आता कर्जत पोलिस ठाण्याची सूत्रे हाती घेणार आहेत.
अल्पावधीत झालेल्या या बदल्यांमुळे कर्जत परिसरात चर्चांना उधाण आले आहे. संदीप भोसले यांच्या बदलीमागे प्रशासकीय कारणे सांगितली जात असली, तरी या निर्णयामागे राजकीय हस्तक्षेप असल्याची कुजबुज सुरू आहे. काही दिवसांतच झालेल्या या बदलीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, याआधीही कर्जत पोलिस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांना आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदलीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे कर्जत पोलिस ठाण्याच्या प्रशासकीय कामकाजावर राजकीय दबाव आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या राजकीय संघर्षांचा परिणाम पोलिस प्रशासनावर होत आहे का, तसेच अधिकाऱ्यांना निर्भीडपणे काम करण्यास मर्यादा येत आहेत का, याबाबतही चर्चा रंगू लागली आहे. कायदा-सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे ही पोलिस प्रशासनाची जबाबदारी असताना वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे कामकाजावर परिणाम होतो का, याकडेही लक्ष वेधले जात आहे.
............
कायदा-सुव्यवस्था राखणे आवाहन
नवनियुक्त पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांना प्रदीर्घ आणि विविध क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे. ते १९९६ पासून मुंबई पोलिस दलात कार्यरत होते. त्यानंतर २०२१ पासून त्यांनी गोंदिया या नक्षलग्रस्त भागात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. पुढे २०२३ मध्ये पालघर, तर २०२४ पासून रायगड जिल्हा पोलिस दलात त्यांनी सेवा बजावली. जुलै २०२५ मध्ये त्यांची श्रीवर्धन पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. आता कर्जतसारख्या महानगर प्रदेशालगतच्या संवेदनशील व वेगाने विकसित होणाऱ्या भागात काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कर्जत परिसरातील नागरिकांना नव्या पोलिस निरीक्षकांकडून प्रभावी कायदा-सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण आणि जनतेशी सुसंवाद साधण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, पकोडे आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होणार, बळीराजाच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध; कृषी राज्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिर गाभारा दर्शन चार दिवस राहणार बंद; मंदिर प्रशासनाकडून माहिती

Latest Marathi News Live Update : संगमनेरमध्ये शेअर मार्केटच्या नावाने 62 जणांची फसवणूक

SCROLL FOR NEXT