मुंबई

केडीएमसी निवडणूक रणधुमाळीला वेग

CD

कल्याण-डोंबिवलीत अर्जविक्रीचा विक्रम
पहिल्याच दिवशी ९१२ उमेदवारी अर्जांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ ः कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून, पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांनी अर्जांसाठी मोठी गर्दी केली आहे. मंगळवारी (ता. २३) निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी ९ निवडणूक निर्णय अधिकारी (RO) कार्यालयांतून तब्बल ९१२ उमेदवारी अर्जांचे वाटप झाले. या विक्रमी आकड्यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण १२२ जागांसाठी ३१ पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक पार पडणार आहे. पहिल्याच दिवशी झालेली अर्जांची विक्री पाहता, प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबतच अपक्ष आणि नवोदित उमेदवारांची मोठी फळी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज खरेदी झाल्याने प्रमुख राजकीय पक्षांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यास इच्छुक उमेदवार अपक्ष किंवा बंडखोर म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही संभाव्य बंडखोरी रोखणे आणि नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करणे, हे आता पक्ष नेतृत्वापुढील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत अर्ज भरणे, छाननी आणि माघारी या टप्प्यांदरम्यान राजकीय समीकरणे वेगाने बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT