मुंबई

तहसील कार्यालयातील हिरकणी कक्ष बंद

CD

तहसील कार्यालयातील हिरकणी कक्ष बंद
लहान बाळांसह येणाऱ्या महिलांची मोठी गैरसोय
खालापूर, ता. २४ (बातमीदार) : खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष सध्या बंद अवस्थेत आहे. त्‍यामुळे विविध कामानिमित्त तहसील कार्यालयात येणाऱ्या लहान बाळांसह महिलांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्‍हणजे हिरकणी कक्षाच्या जागेत आधार केंद्र सुरू करण्यात आल्याने मूळ उद्देशाला हरताळ फासल्याचे बोलले जात आहे. त्‍यामुळे हिकरणी कक्ष तत्‍काळ सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दररोज शेकडो नागरिक महसूलविषयक प्रमाणपत्रे, अर्ज आदी कामांसाठी तहसील कार्यालयात येत असतात. अनेक वेळा काम मार्गी लागेपर्यंत नागरिकांना तासन्‌तास तहसील आवारात बसून प्रतीक्षा करावी लागते. अशा परिस्थितीत लहान बाळांना घेऊन आलेल्या महिलांसाठी सुरक्षित, शांत आणि सोयीस्कर जागेची नितांत गरज असते. ही गरज ओळखून सुमारे पाच वर्षांपूर्वी तत्कालीन तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या संकल्पनेतून हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली होती. महिलांना स्तनपान, विश्रांती व बाळांच्या देखभालीसाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणे, हा या कक्षामागील मुख्य उद्देश होता. हायटेक बिर्ला कारखान्याच्या सामाजिक बांधिलकीतून हा हिरकणी कक्ष उभारण्यात आला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, सध्या या हिरकणी कक्षाच्या जागेत आधार केंद्र सुरू करण्यात आल्याने मूळ उद्देशच बाजूला पडल्याची भावना महिलांकडून व्यक्त केली जात आहे.
..............
उघड्यावर स्‍तनपान
हिरकणी कक्ष उपलब्ध नसल्यामुळे लहान बाळांसह आलेल्या महिलांना तहसील कार्यालयाच्या गर्दीच्या परिसरात उघड्यावर स्‍तनपान करावे लागत आहे. यामुळे महिलांची शारीरिक व मानसिक गैरसोय होत असून, बाळांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हिरकणी कक्ष पूर्ववत सुरू करावे किंवा पर्यायी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. यासंदर्भात तहसीलदार अभय चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते अलिबाग येथे गेले असल्याची माहिती मिळाली.

छायाचित्र : हिरकणी कक्ष बंद झाल्याने तहसील कार्यालयाच्या आवारात लहान बाळांसह बसण्याची वेळ महिलांवर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: माळेगाव कारखान्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संचालकपदी बिनविरोध; संचालक मंडळाच्या विशेष सभेत निर्णय!

Viral Video : तुम्हीही नाश्त्यात पोहे आवडीने खाता ? व्हायरल व्हिडिओ पाहून उघडतील डोळे

PAK vs NAM सामन्यावर पावसाचे ढग; ऑस्ट्रेलियासारखीच पाकिस्तानची अवस्था होणार? नेमकं कसं आहे समीकरण

Latest Marathi News Live Update : सातारा नगरपरिषदेच्या ‘अघोरी नृत्या’ला अंनिसचा विरोध

Railway Loco Pilots: प्रशासनाकडून दबाव, तणावपूर्ण कामकाज अन्...; मुंबई लोकलच्या लोको पायलटांचा सामूहिक VRS अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT