मुंबई

या वर्षातील अजूनही १०७ मुले बेपत्ता

CD

ठाण्यात १०७ मुलांचा शोध लागेना
पालकांच्या काळजाचा ठोका चुकला; १,१९४ मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश
पंकज रोडेकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : घरातून रागाने किंवा अज्ञात कारणाने बाहेर पडलेले आपले मूल परत येईल का, या एकाच विवंचनेत ठाणे शहर परिसरातील १०७ कुटुंबे आज अस्वस्थतेत दिवस काढत आहेत. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत १,३०१ मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी १,१९४ मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असले, तरी अद्याप ८९ मुली आणि १८ मुलांचा शोध लागलेला नाही.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उल्हासनगर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. बदलती जीवनशैली आणि वाढते नागरीकरण यामुळे मुलांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम यामागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. पालकांनी मोबाईलवरून टोकणे किंवा अभ्यासासाठी रागावल्यामुळे अनेक मुले टोकाचे पाऊल उचलून घर सोडतात. अनेक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेण्याचे प्रकार समोर येत आहेत. नातेवाइकांकडून कामासाठी शहरात आणली जाणारी मुले किंवा फिरण्याच्या हौसेपोटी घर सोडणारी मुले, अशा विविध कारणांमुळे पोलिसदप्तरी नोंदी वाढत आहेत.
ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ बेपत्ता मुलांचा शोध घेत आहे. तपासात असे आढळले आहे, की अनेक मुले उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांकडे वळली आहेत. मूल हरवल्यानंतर पालकांचे आयुष्य थांबते. आमचे पथक अहोरात्र काम करीत असून उर्वरित १०७ मुलांनाही लवकरच शोधून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करू, असा आमचा विश्वास असल्याचे ठाणे पोलिस प्रशासनाने म्हटले आहे.
-------------
या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात स्थापन करण्यात आलेल्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटमार्फत तसेच स्थानिक पोलिस ठाण्यांच्या मदतीने बेपत्ता मुलांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा काम करीत आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत बेपत्ता झालेल्या १,३०१ मुलांपैकी १०७ मुलांचा शोध बाकी आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
- अमरसिंह जाधव, उपायुक्त, गुन्हे शाखा, ठाणे शहर
-------------
बेपत्ता मुलांचा तक्ता
सन हरवलेली
मुली / मुले
२०२१ ६५५ / १९९
२०२२ ७६४ / २७२
२०२३ ८१२ / ४२३
२०२४ ९०६ / ३९३
नोव्हेंबर २०२५ ९०० / ४००
एकूण ४,०३७ / १,६८७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी! कॅबिनेट बैठकीत निर्णय; निवडणुकीबाबतही मोठं पाऊल

Sahyadri Trekkers : सह्याद्रीतील लिंगाणा सुळक्यावर ३२ जणांची साहसपूर्ण चढाई; आंतरराष्ट्रीय पर्वत दिन उत्साहात साजरा!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप आमदार उद्या मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार

Mohol News : मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोहोळच्या तरुण नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे सन्मानित; शहर विकासासाठी निधीची ग्वाही!

Navi Mumbai: नेरूळ स्थानक परिसरात बेवारस वाहनांचा सुळसुळाट, प्रवाशांची गैरसोय!

SCROLL FOR NEXT