मुंबई

सुसंवादाचे वातावरण निर्माण व्हावे आणि महायुती घडावी : गणेश नाईक

CD

महायुती सन्मानजनक, सुसंवादाने घडावी
गणेश नाईक यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : केंद्र आणि राज्य पातळीवरील नेतृत्वाने महायुती व्हावी, अशी भूमिका मांडली असली तरी ही युती सर्व घटकांसाठी सन्मानजनक असावी. सर्वत्र सुसंवादाचे वातावरण निर्माण व्हावे आणि सकारात्मक निर्णय निघावेत, अशी अपेक्षा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली. ठाण्यातील नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
नवी मुंबईतील जागावाटपाबाबत विचारले असता, आपण वाटाघाटी समितीचे सदस्य नसल्याने त्या प्रस्तावांची माहिती नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. तसेच, ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर भाष्य करणे त्यांनी टाळले. "मी ज्या पक्षात आहे, त्या पक्षाची अधिकृत भूमिका प्रवक्त्यांनीच मांडावी, असे आमचे धोरण आहे," असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. राजकारणातील यश-अपयशावर बोलताना नाईक म्हणाले की, "यश आणि अपयशाचे चक्र सुरूच असते. जे नेते जनसामान्यांशी सातत्याने संपर्कात राहून काम करतात, तेच दीर्घकाळ टिकतात. जनता नेहमीच चांगल्या विचारांच्या आणि कामाच्या पाठीशी उभी राहते."
……………….
मानसन्मान जपा!
"आत्मविश्वास असणे गरजेचे आहे, मात्र तो बाळगताना इतरांचा मानसन्मान जपला गेला पाहिजे. प्रगती नक्कीच व्हावी, पण ती दुसऱ्यांवर अन्याय करून नसावी. जे दुसऱ्यांचे अधिकार हिरावून घेतात, ते कधीच सुखी राहत नाहीत," अशा शब्दांत गणेश नाईक यांनी नाव न घेता विरोधकांना किंवा मित्रपक्षांना सूचक टोला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Marriage Scheme : शेतकरी वराशी विवाह करणाऱ्या वधूच्या नावावर 10 लाख ठेवा; शेतकरी संघाची मागणी, नोकरीत आरक्षणाचाही आग्रह

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर करून Super-8 मध्ये पोहचलेल्या झिम्बाब्वेचं चाहत्यांसोबत अनोखं सेलिब्रेशन; पाहा Video

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

Latest Marathi News Live Update : चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लवकरच निवडणुका

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT