मुंबई

नववर्षाच्या स्‍वागतासाठी नवी मुंबई सज्ज

CD

नववर्षाच्या स्‍वागतासाठी नवी मुंबई सज्ज
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कायदा-सुव्‍यवस्‍था राखण्यासाठी यंत्रणा सतर्क
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) ः नवी मुंबईत एकीकडे महापालिका निवडणुकींचा ज्वर चढलेला असतानाच, दुसरीकडे थर्टी फर्स्टच्या जल्लोषाचीही जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरात सध्या राजकीय हालचाली आणि नववर्ष स्वागताचा उत्साह हे दोन्ही विषय एकाच वेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. उमेदवारांचे दौरे, बैठका, प्रचार फेऱ्या सुरू असतानाच हॉटेल्स, पब्स, मॉल्स, रिसॉर्ट्स आणि पर्यटनस्थळे ३१ डिसेंबरच्या स्वागतासाठी सज्ज होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची धावपळ वाढली आहे. प्रभागनिहाय बैठका, कार्यकर्त्यांचे मेळावे, मतदारांशी थेट संवाद, सोशल मीडियावरून प्रचार यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इच्छुक उमेदवार सकाळपासून रात्री उशिरापर्यंत जनसंपर्कात व्यग्र आहेत. अशा परिस्थितीतच नववर्ष स्वागताच्या तयारीमुळे शहरात वेगळीच लगबग दिसून येत आहे.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील मोठी हॉटेल्स, पब्स, फार्म हाऊस, रिसॉर्ट्स येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. गीत, संगीत, नृत्याचे कार्यक्रम, विशेष भोजन व्यवस्था, आकर्षक ऑफर्स आणि पॅकेजेस जाहीर करण्यात आली आहेत. काही ठिकाणी तर आठवडाभर आधीच ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’चे बुकिंग सुरू झाले असून अनेक ठिकाणी ऍडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खवय्यांसाठी खास मेन्यू, सवलती, तसेच कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
...................
पोलिसांवर वाढता ताण
निवडणुका आणि नववर्ष स्वागत हे दोन्ही एकाच वेळी हाताळण्याचे मोठे आव्हान पोलिस प्रशासनासमोर उभे राहिले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने प्रचारावर लक्ष ठेवावे लागत असतानाच, थर्टी फर्स्टच्या रात्री कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीही स्वतंत्र बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणे, रस्त्यांवर धिंगाणा, बेकायदेशीर पार्ट्या, ध्वनिप्रदूषण यावर कडक नजर ठेवण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. आवश्यक त्या ठिकाणी नाकाबंदी, गस्त, तसेच विशेष पथके तैनात केली जाणार आहेत. राजकीय पक्षांनीही प्रचार करताना संयम बाळगावा आणि आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी नववर्षाचे स्वागत करताना कायद्याचे पालन करावे, सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि कोणत्याही गैरप्रकारात सहभागी होऊ नये, असेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

Kagal MIDC Accident : दुबईहून सुट्टीला आलेल्या १३ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT