मुंबई

महापालिका मुख्यालय परिसर ‘अपघात क्षेत्र’

CD

महापालिका मुख्यालय परिसर ‘अपघात क्षेत्र’
नवी मुंबई, ता. २४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाजवळील पाम बीच मार्ग आणि उलवे-जेडएनपीटीकडे जाणारा मार्ग अपघातांच्या हॉटस्पॉटमध्ये समाविष्ट होत आहेत. गेल्या दोन महिन्यांत या मार्गांवर झालेल्या लहान-मोठ्या अपघातांत तीन प्रवाशांचा मृत्यू तर सातहून अधिक जखमी झाले आहेत, अशी माहिती एनआरआय सागरी पोलिस ठाण्याने दिली.
नवी मुंबई शहराच्या केंद्रात असूनही झटपट वाढणारे शहरीकरण आणि लांबच्या लांब रस्त्यांवर वेगवान वाहने अपघातांची प्रमुख कारणे आहेत. उरण फाटा, बेलापूर-उलवे मार्गावर दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांच्या धावपळीने गाड्या धडक घेऊन येत असल्यामुळे नागरिकांना धोका निर्माण होत आहे. सिग्नल तोडणे, ओव्हरटेक करणे यासारख्या नियमभंगामुळे अनेक लहान-मोठ्या अपघातांत प्रवासी जखमी होत आहेत. प्रवाशांनी सिग्नल यंत्रणा व वेगाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
कोट
‘वाहतूक पोलिस आणि एनआरआय सागरी पोलिस ठाणे रात्री नाकाबंदी व जनजागृती करीत आहेत; परंतु काही वेळा आव्हानात्मक ठरते. येत्या काळात अपघाताच्या ठिकाणी विशेष खबरदारी घेतली जाईल.
- देवेंद्र पोळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एनआरआय सागरी पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Solapur News: साेलापूरातील ‘त्या’ सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार निर्णय!

Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT