मुंबई

नेरूळ स्थानक परिसरात बेवारस वाहनांचा सुळसुळाट

CD

नेरूळ स्थानक परिसरात बेवारस वाहनांचा सुळसुळाट
पार्किंग जागा अडवून प्रवाशांची गैरसोय
नेरूळ, ता. २४ (बातमीदार)ः स्वच्छ, सुनियोजित आणि आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. नवी मुंबई महानगरपालिका व सिडकोच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे शहराने स्वच्छतेच्या शर्यतीत सातत्याने अव्वल स्थान पटकावले आहे. मात्र, या उजळ प्रतिमेला नेरूळ रेल्वे स्थानक परिसरातील बेवारस, भंगारात निघालेली वाहने आणि अनधिकृत पार्किंग यांमुळे गालबोट लागत आहे.
नेरूळ रेल्वे स्थानकाबाहेरील वाहनतळात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी, चारचाकी तसेच हातगाड्या बेवारस अवस्थेत उभ्या असल्याचे चित्र आहे. यातील अनेक वाहने पूर्णपणे निकामी झाली असून, धूळखात पडून आहेत. त्यामुळे प्रवाशांसाठी असलेली पार्किंगची मौल्यवान जागा अडवली जात आहे. हे पार्किंग वाहनतळ आहे की भंगाराचे गोदाम, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
सुनियोजित शहरात पार्किंग ही अत्यावश्यक सुविधा असताना, या ठिकाणी भंगार वाहने, अनधिकृत फेरीवाल्यांच्या गाड्या तसेच समाजविघातक घटकांचा वावर वाढत असल्याचे चित्र दिसून येते. विशेषतः रात्रीच्या वेळी गर्दुल्ले, भिकारी आणि नशेखोरांचा येथे वावर वाढल्याने रेल्वे प्रवासी व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सिडकोच्या पार्किंग विभागाने तातडीने लक्ष घालून बेवारस व भंगार वाहने हटवावीत, तसेच अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे.

दुचाकींचे अनधिकृत पार्किंग
नेरूळ स्थानकाबाहेरील रिक्षा स्टॅन्डच्या मार्गिकेतच शेकडो दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. पश्चिम बाजूस सिडकोने ‘पे अँड पार्क’ची सुविधा उपलब्ध करून दिली असतानाही, पार्किंग शुल्क टाळण्यासाठी अनेक दुचाकीस्वार रिक्षा स्टॅन्डच्या मार्गातच वाहने उभी करत आहेत. परिणामी रिक्षा वाहतूक विस्कळीत होत असून, सकाळी व सायंकाळी स्टेशन परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

पार्किंगसाठी असलेल्या जागांवर अनेक वर्षांपासून जुनी, निकामी वाहने पडून आहेत. त्यामुळे पार्किंगची जागा अडतेच, शिवाय स्थानक परिसर विद्रूपही दिसतो.
- विजय शिंदे, स्थानिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic jam : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी; खंडाळा बोगद्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Sugar Factory : कारखाने वर्षभर सुरू ठेवण्यासाठी हालचाली, मल्टिफीडसाठी ६३ कारखान्यांचा पुढाकार

T20 WC, IND vs NED: ...अन् मोठा अनर्थ थोडक्यात टळला! सूर्यकुमार - रिंकू सिंगची जोरात धडक अन् चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; Video

Chhatrapati Shivaji Maharaj:विदर्भभूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने ६ वेळा पावन, आग्रा कैदेतून सुटल्यानंतर विदर्भातून प्रवास

SCROLL FOR NEXT