मुंबई

बदलापूर पालिकेत ‘नव्या चेहऱ्यांचा’ जल्लोष

CD

मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २४ : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेची नुकतीच पार पडलेली सार्वत्रिक निवडणूक अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरली आहे. ४९ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे २४, भाजपचे २२, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या तीन महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. या निवडणुकीतील सर्वांत ठळक बाब म्हणजे तब्बल २२ नगरसेवक प्रथमच पालिकेच्या सभागृहात प्रवेश करणार आहे. बदलापूरच्या राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
पहिल्याच निवडणुकीत घवघवीत यश मिळवत या नवख्या उमेदवारांनी अनेक दिग्गज व प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला आहे. मतदारांनी स्पष्टपणे बदलाचा कौल दिल्याचे या निकालातून दिसून येत आहे. वर्षानुवर्षे सत्तेवर वर्चस्व राखणाऱ्या अनेक अनुभवी नगरसेवकांना घरचा रस्ता धरावा लागला आहे. काही प्रस्थापित उमेदवार निसटत्या फरकाने विजयी झाले, तर अनेक नवीन उमेदवार अत्यल्प मतांनी पराभूत झाले असून, त्यांनी अनुभवी उमेदवारांना कडवी झुंज दिली.
निवडून आलेल्या २२ नव्या नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे १० उमेदवार आहे. त्यात सहा महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. भाजपचे नऊ नवोदित उमेदवार विजयी झाले असून, त्यात सहा महिला व तीन पुरुष आहेत. विशेष बाब म्हणजे अजित पवार गटाच्या तिन्ही महिला उमेदवारांनी पहिल्याच निवडणुकीत यश मिळवत पालिकेत प्रवेश केला आहे. या निकालातून बदलापूरकरांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा ठाम निर्णय घेतल्याचे स्पष्ट होते.
वेगाने विस्तारत असलेल्या बदलापूर शहरातील नागरी समस्या, पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा आणि नियोजनबद्ध विकास या आव्हानांवर हे सुशिक्षित व नवखे नगरसेवक अधिक प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. बदलापूरच्या राजकारणात हा निकाल सत्ताबदलाचा नव्हे, तर विचारबदलाचा संकेत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

शिक्षणाला प्राधान्य
यंदाच्या निवडणुकीत बदलापूरकरांनी शिक्षणाला विशेष प्राधान्य दिल्याचे चित्र दिसून आले. निवडून आलेल्या एकूण ४९ नगरसेवकांपैकी सुमारे ८२ टक्के उमेदवार सुशिक्षित आहेत. त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, अभियंते, अकाउंटंट, वास्तुविशारद आणि वकील यांचा समावेश आहे. शिक्षण, व्यावसायिक अनुभव आणि प्रशासकीय जाण या निकषांवर विचारपूर्वक मतदान केल्याचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aravalli Case: अरावली वाचवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नवीन खाण परवान्यांवर बंदी; उद्योगाला मोठा झटका

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

Dhaka bomb blast : भीषण बॉम्बस्फोटाने बांगलादेशचं ढाका हादरलं!; भर बाजारपेठेत अज्ञाताने फेकला 'क्रूड बॉम्ब'

UPSC Success Story : ग्रामीण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी डॉ.भगवंत पवार यांचे UPSC CMS मध्ये ऑल इंडिया 25वी रँक!

Pune Digital Arrest : डेक्कनमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक; ७९ वर्षीय महिलेची १७ लाखांची आर्थिक हानी!

SCROLL FOR NEXT