मुंबई

हैदराबाद हायस्पीड ट्रेन नवी मुंबई विमानतळाला जोडणार

CD

हैदराबाद हाय स्पीड ट्रेन नवी मुंबई विमानतळाला जोडणार
प्राथमिक स्तरावर केंद्राची मान्यता

सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २४ : अधिक गतिमान प्रवासी सुविधा देण्यासाठी हैदराबादहून मुंबईला जोडणारी प्रस्तावित हाय स्पीड ट्रेन नवी मुंबई विमानतळाला जोडली जाणार आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिल्याचे समजते. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनमार्फत या हजारो कोटी खर्च असणाऱ्या प्रकल्पाचे काम पाहिले जाणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलमार्ग अशा विविध पर्यायांची जोड देण्यात येत आहे. बहुतांश कामे वेगात सुरू असून, नव्या वर्षात विमानतळाकडे जाणारे सर्वच मार्ग पूर्णत्वास येणार आहेत. यापैकी मेट्रोची मार्ग क्रमांक आठ म्हणजे गोल्डन लाइन ही विमानतळाच्या अनुषंगाने सर्वांत महत्त्वाची ठरणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यादरम्यान एकूण ३४ किलोमीटर, अर्धी भुयारी आणि उन्नत अशी मेट्रो विकसित केला जाणार आहे. तत्पूर्वी नवी मुंबई परिसरात होणारा औद्योगिक आणि वाणिज्य विकास पाहता थेट हैदराबादहून नवी मुंबई विमानतळावर पोहोचता यावे, याकरिता केंद्र सरकारने हाय स्पीड रेल्वेचा नवा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. सध्या हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर आहे. या प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालाला केंद्र व राज्य सरकारची मंजुरी प्रलंबित आहे. केंद्र व राज्य सरकार या दोघांमध्ये या प्रकल्पाबाबत चर्चा सुरू असून, हा प्रकल्प करण्यात सरकार महत्त्वाकांक्षी आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबई हे परिसर अहमदाबादनंतर थेट हैदराबादमुळे दक्षिणेतील राज्यांना वेगाने जोडले जाणार आहेत. त्यामुळे व्यापार अधिक वृद्धिंगत होण्यास मदत मिळणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
...
फायदा असा
- मुंबई ते हैदराबाद हे अंतर ७६७ किलोमीटर
- सध्या सुरू असलेल्या रेल्वेने या मार्गावर १४ ते १५ तास प्रवास करावा लागतो.
- हाय स्पीड रेल्वेमुळे हाच प्रवास अवघ्या ३.३० ते ४.३० तासांवर येईल.
- या प्रकल्पात हैदराबाद ते मुंबई यादरम्यान १० ते ११ रेल्वेस्थानके असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात भूकंप! बाजार उघडताच सेंसेक्स 1,600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

T20 World Cup: आज मिळणार पहिला फायलिस्ट! दक्षिण आफ्रिका - न्यूझीलंडमध्ये ईडन गार्डन्सवर रंगणार सेमीफायनल

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील डॉक्टर ताब्यात

Galli Brothers : दुबईतील गलाई बांधव सुरक्षित; युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण

Shahbaz Sharif Viral Post : 'कंडेम' लिहायच्या नादात लिहिलं 'कंडोम'! पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मोठी घोडचूक; 'तो' स्क्रीनशॉट होतोय जगभर व्हायरल

SCROLL FOR NEXT