मुंबई

गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

CD

गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण
मुंबई, प्रतिनिधी : गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे, सर्वांगीण आणि पूर्णतः मोफत शिक्षण देण्याच्या उद्देशाने क्रिस्टल हाउस इंडिया या सामाजिक संस्थेने अत्याधुनिक क्रिस्टल हाउस स्कूल सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून देशाची भावी पिढी सुसंस्कृत आणि सक्षम घडवण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे खारघर-कळवा परिसरात आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज शाळा उभारण्यात येणार असून, येथे सीबीएसई अभ्यासक्रम राबविण्यात येईल. ठाणे महापालिकेच्या सहकार्याने ही शाळा सुरू करण्यात येणार आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मोफत गणवेश, पुस्तके, वाहतूक, भोजन आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंत २१० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून, पुढील वर्षांत ही शाळा टप्प्याटप्प्याने इयत्ता बारावीपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची निवड गरिबीआधारित आणि पूर्णतः पारदर्शक प्रक्रियेद्वारे केली जाणार असून, समाजातील सर्वात वंचित कुटुंबांतील मुलांना प्राधान्य दिले जाईल.
शैक्षणिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य विकास आणि सामाजिक जाणीव वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. इयत्ता बारावीनंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशनाची मदतही पुरवली जाणार आहे.
यासंदर्भात ठाणे महापालिकेने सांगितले, की हा प्रकल्प वंचित समुदायातील मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल. क्रिस्टल क्रिस्टल इंडियाच्या अनुभवाचा लाभ ठाण्यातील विद्यार्थ्यांना मिळणार असून, हा उपक्रम सार्वजनिक-खासगी भागीदारीचे उत्तम उदाहरण ठरेल. ही शाळा जून २०२६ पासून सुरू होण्याची अपेक्षा असून, भविष्यात हजारो विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

SCROLL FOR NEXT