मुंबई

परवानगीशिवाय वॉटरस्पोर्ट्स सुरू

CD

परवानगीशिवाय वॉटरस्पोर्ट्स सुरू
पर्यटकांच्या जीवाशी जीवघेणा खेळ, वाढत्या व्यावसायिक स्पर्धेत सुरक्षेकडे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २४ : डिसेंबर महिन्यात पर्यटन हंगाम बहरत असताना रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर परवानगी न घेताच वॉटरस्पोर्ट्स सुरू झाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. स्थानिक ग्रामपंचायत, मेरिटाइम बोर्ड किंवा अन्य कोणत्याही सक्षम यंत्रणेची अधिकृत परवानगी नसतानाही पर्यटकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
मांडवा ते थेट हरिहरेश्वरपर्यंतच्या अनेक समुद्रकिनाऱ्यांवर बनाना राइड्स, जेट स्कीईंग, पॅरासेलिंग, बम्पर राइड्स यांसारख्या जलक्रीडा खुलेआम सुरू आहेत. मात्र, या जलक्रीडांच्या दरम्यान आवश्यक सुरक्षासाधने, प्रशिक्षित कर्मचारी, लाइफ जॅकेट्स, हवामानाची माहिती आणि आपत्कालीन व्यवस्थेचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. यापूर्वी अशा हलगर्जीमुळे पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
खराब हवामानामुळे सध्या जलवाहतूक आणि मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरू नसताना, वॉटरस्पोर्ट्स मात्र जोमात सुरू असल्याचे चित्र आहे. विशेषतः शनिवार-रविवारी मोठ्या संख्येने येणारे पर्यटक या जलक्रीडांचा आनंद घेत असले तरी त्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली जात आहे. ‘कामगारांचे पगार, वाढलेला खर्च आणि गुंतवणूक वसूल करण्यासाठी नाइलाजास्तव वॉटरस्पोर्ट्स सुरू ठेवावे लागत आहेत ’, असे कारण संबंधित व्यावसायिकांकडून दिले जात आहे.
मात्र खराब हवामानात आणि परवानगीशिवाय वॉटरस्पोर्ट्स सुरू करण्यास कोणी परवानगी दिली? असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. जिल्हा प्रशासन, मेरिटाइम बोर्ड आणि स्थानिक यंत्रणांकडून या प्रकाराकडे होत असलेले दुर्लक्ष नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे. पर्यटनाच्या नावाखाली होणारा हा जीवघेणा प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी नागरिक व पर्यटकांकडून होत आहे.
कोट
‘पर्यटकांची सुरक्षा ही सर्व व्यावसायिकांची जबाबदारी आहे. ‘अतिथी देवो भव’ या तत्त्वानुसार वागणूक अपेक्षित असताना काही व्यावसायिक पर्यटकांचा जीव धोक्यात घालत आहेत. संबंधित यंत्रणांनी अशा व्यावसायिकांवर तातडीने कठोर कारवाई करावी.’
- सिद्धार्थ पाटील, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात भूकंप! बाजार उघडताच सेंसेक्स 1,600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

T20 World Cup: आज मिळणार पहिला फायलिस्ट! दक्षिण आफ्रिका - न्यूझीलंडमध्ये ईडन गार्डन्सवर रंगणार सेमीफायनल

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील डॉक्टर ताब्यात

Galli Brothers : दुबईतील गलाई बांधव सुरक्षित; युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण

Shahbaz Sharif Viral Post : 'कंडेम' लिहायच्या नादात लिहिलं 'कंडोम'! पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मोठी घोडचूक; 'तो' स्क्रीनशॉट होतोय जगभर व्हायरल

SCROLL FOR NEXT