मुंबई

उपकरप्राप्त इमारतींचे वर्षभरात स्ट्रक्चरल ऑडिट

CD

उपकरप्राप्त इमारतींचे वर्षभरात स्ट्रक्चरल ऑडिट
म्हाडा विभागनिहाय चार एजन्सी नेमणार; ४० कोटींचा खर्च

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबई शहरातील सुमारे १२ हजार ५०० उपकरप्राप्त (सेस) इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट पुढील वर्षभरात असणार आहे. त्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून विभागनिहाय चार एजन्सींची नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे किती सेस इमारती अतिधोकादायक झाल्या आहेत, त्यांची काय परिस्थिती आहे याबाबतची माहिती समोर येणार आहे. यासाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
मुंबई शहरात सध्या आठ-दहा दशकांपूर्वी उभारलेल्या १३ हजारांहून अधिक उपकरप्राप्त इमारती आहेत. यापैकी अनेक इमारती जुन्या झाल्याने मोडकळीस आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात या इमारती कोसळून जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार या अतिधोकादायक इमारतींतील रहिवासी-भाडेकरूंचे संक्रमण शिबिरात स्थलांतर केले जाते.

दरम्यान, मागील पावसाळ्याआधी म्हाडाने समारे ५०० इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यामध्ये जवळपास ९६ इमारती अतिधोकादायक आढळल्या होत्या. एकाच वेळी सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधित सेस इमारतींचे चार विभाग असून, त्याचे वर्षभरात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी चार एजन्सींची नियुक्ती केली जाणार आहे. त्याकरिता लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. त्यामुळे वेळेत हे ऑडिट पूर्ण करून येणाऱ्या या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातील सूत्रांनी दिली.

२०-९० हजार रुपये खर्च
म्हाडाने १२ हजार ५०० सेस इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी जवळपास ४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एका इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी २० ते ९० हजार रुपयांचा खर्च येणार आहे. इमारतीचा आकार, उंची किती आहे त्यावर ऑडिटचा खर्च अवलंबून असणार आहे. पहिल्या टप्प्यात जास्त मोडकळीस आलेल्या इमारतींचे प्राधान्याने स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NZ beat SA in SF : दक्षिण आफ्रिका 'Chokers'! न्यूझीलंडचा T20 World Cup फायनलमध्ये प्रवेश, फिन'टॅस्टीक' शतक

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT