अवघे विश्वची माझे घर मानावे!
राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे यांचा सामाजिक संदेश
पालघर, ता. २४ ः सकाळ माध्यमचे भक्ती शक्ती व्यासपीठ हा मोठा उपक्रम आहे. समाजाला दिशा दाखवण्याचे सातत्यपूर्ण काम सकाळ करत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. डॉ. चारुदत्त आफळे यांनी पालघरमध्ये केले. सकाळ भक्ती शक्ती व्यासपीठ आणि बोईसरच्या शिवशक्ती सामाजिक संघटनेतर्फे आयोजित संत ज्ञानेश्वर माउली यांच्यावर आफळे यांनी बुधवारी सुश्राव्य कीर्तन करताना हे प्रतिपादन केले.
अवघे विश्वची माझे घर आहे आणि या घराला कुटुंबीय मानून मला घडवायचे आहे, अशी वृत्ती सर्वांची हवी, असे आफळे बुवा यांनी कीर्तनातून सांगितले. जे आपण ठरवलंय, त्यादृष्टीने केलेले प्रयत्न यालासुद्धा यश म्हणतात. ज्याला सुख कळते त्या आनंदाची पायरी कशी चढावी, हे त्यांनी कीर्तनातून श्रोत्यांना पटवून दिले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास ७५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने हे कीर्तन पालघरच्या लायन्स क्लब सभागृहात आयोजित करण्यात आले होते. आनंद आणि सुख या दोन्हीही वेगळ्या बाबी असल्या तरी सामाजिक, वैयक्तिक जीवनात सुख आनंद शोधा आणि त्याचा उपभोग घ्या, असे आवाहन आफळे यांनी केले.
आफळे बुवांनी अवघाची संसार सुखाचा, माझे माहेर पंढरी अशा एकाहून अनेक गायलेल्या सुमधुर गीतांनी सभागृह भक्तीत तल्लीन झाला. कीर्तनादरम्यान आफळे बुवा यांनी भगवतगीतेचा भाव आणि सार याचा उलगडा सोप्या शब्दात केला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, कार्यक्रमाचे प्रयोजक शिवशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक संजय पाटील, पालघर नगर परिषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष उत्तम घरत, सकाळ कम्युनिटी डेव्हलपमेंटचे व्यवस्थापक, सकाळ मल्टीमीडिया संपादक अंकित काणे, भक्ती शक्ती व्यासपीठ पालघरचे मुख्य व्यवस्थापक दिनकर कोकीतकर, सकाळ तनिष्काच्या दीपा पामाळे, पालघर पंचायत समितीचे माजी उपसभापती मिलिंद वडे, माजी जि. प. सदस्य महेंद्र भोणे, पालघरचे अनेक नवनियुक्त नगरसेवक, शेकडो पालघरकर उपस्थित होते. उपक्रमशील कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी यांनी त्यांच्या हस्ते रेखाटलेल्या आफळे बुवांचे रेखाचित्र या कीर्तनात देण्यात आले.
----
विविध बाबींचा उलगडा
महाराष्ट्रातील हिंदू धर्माच्या वारकरी परंपरेचा पाया रचणारे ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीचे प्रणेते, भावार्थदीपिका, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठाचे अभंग अशा काव्यरचना ते अध्यात्म तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर माउली यांच्या जीवनपटावर कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी सुश्राव्य कीर्तन केले. ज्ञानेश्वरांची भक्ती, त्यांचे अध्यात्म आणि त्यांच्याशी निगडित विविध बाबींचा उलगडा आपल्या कीर्तनातून आफळे बुवांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.