मुंबई

..................................

CD

प्रसूतीनंतर रक्ताच्या गुठळीचा धोका
डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेण्याचे तज्ज्ञांचे मत


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील टप्पा आहे. या काळात होणारे हार्मोनल आणि शारीरिक बदल आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असले तरी काही वेळा ते आरोग्यविषयक धोक्यांना आमंत्रण देतात. त्यातीलच खोल नसांमध्ये रक्ताची गुठळी होणे (डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजेच डीव्हीटी) ही एक गंभीर पण अनेकदा दुर्लक्षित राहणारी समस्या आहे. त्यामुळे धोके ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येते.
गर्भधारणेदरम्यान शरीरात रक्त किंचित दाट होण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते. प्रसूतीदरम्यान होणारा रक्तस्राव नियंत्रणात ठेवण्यासाठी हा बदल उपयुक्त असतो. मात्र त्याच वेळी खोल नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, डीव्हीटी ही अवस्था फार सामान्य नसली तरी ती गंभीर आहे. अंदाजे प्रत्येक ५०० ते २,००० गर्भधारणांपैकी एका गर्भवतीमध्ये ही समस्या दिसून येते आणि ती कोणत्याही वयोगटात उद्भवू शकते.
डीव्हीटीमध्ये प्रामुख्याने पायांच्या खोल नसांमध्ये रक्ताची गुठळी तयार होते. ही गुठळी फुप्फुसांपर्यंत पोहोचल्यास फुप्फुसातील धमनीमध्ये रक्ताची गुठळी अडकणे (पल्मोनरी एम्बोलिझम)सारखी जीवघेणी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान होणारे हार्मोनल बदल, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढत्या गर्भाशयामुळे नसांवर येणारा दाब हे प्रमुख जोखीम घटक आहेत. याशिवाय सिझेरियन प्रसूती, लठ्ठपणा, दीर्घकाळ बसून राहणे यामुळेही धोका वाढतो. एका पायात सूज येणे, पोटऱ्या किंवा मांडीत वेदना, जडपणा, लालसरपणा आणि स्पर्शास वेदना होणे ही डीव्हीटीची सामान्य लक्षणे मानली जातात.


गर्भवती तसेच नव्याने प्रसूती झालेल्या महिलांनी पायातील सूज किंवा वेदनांकडे दुर्लक्ष करू नये. डॉपलर अल्ट्रासाऊंडद्वारे डीव्हीटीचे अचूक निदान करता येते आणि वेळेवर उपचार केल्यास आई व बाळ दोघांचीही सुरक्षितता राखता येते.
- डॉ. सुरभी सिद्धार्थ, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ


डीव्हीटी टाळण्यासाठी काय करावे?

- नियमित चालणे आणि प्रसूतीपूर्व व्यायाम करून सक्रिय राहा.
- एका जागी दीर्घकाळ बसून राहणे टाळा.
- पायांची नियमित हालचाल करा.
- पुरेसे पाणी प्या आणि शरीर जलयुक्त ठेवा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याने पायांना हलका दाब देणारे विशेष मोजे वापरा.
- पायाला सूज किंवा वेदना जाणवल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT