मुंबई

डंपरच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; अपघातानंतर चालक फरार

CD

​डम्परच्या धडकेत बालकाचा मृत्यू
उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) ः एका भरधाव डम्परने अंगणात बसलेल्या तीन वर्षांच्या बालकाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात वेदांश पाटील याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डम्परचालक घटनास्थळी कोणतीही मदत न करता वाहन सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी हिललाइन पोलिसांनी डम्परचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगरच्या हिललाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांगरूळ येथील विकास पाटील यांचा मुलगा वेदांश हा आपल्या घराच्या अंगणातील कट्ट्यावर बसला होता. याच वेळी घराच्या बाजूच्या रस्त्यावरून जाणाऱ्या डम्परने वेदांशला जोरदार धडक दिली. डम्परचे चाक वेदांशच्या डोक्यावरून गेल्याने त्याला गंभीर इजा झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता, की परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली; मात्र डम्परचालकाने जखमी बालकाला कोणतीही वैद्यकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला नाही. उलट डम्पर घटनास्थळीच सोडून चालक तेथून पळून गेला.
याप्रकरणी वेदांशचे वडील विकास पाटील यांनी हिललाइन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी डम्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुरवाडे करीत असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT