मुंबई

नवीन वर्षात डहाणू रेल्वेच्या फेऱ्या वाढणार का?

CD

डहाणू रेल्वेच्या फेऱ्या वाढणार का?
अपुऱ्या सेवेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल; कोंडी, उशीर नित्याचाच
निखिल मेस्त्री : सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. २७ ः नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण जग सज्ज होत असताना, डहाणू ते वैतरणादरम्यानच्या लाखो रेल्वे प्रवाशांच्या नशिबी मात्र पुन्हा तोच संघर्ष, तीच गर्दी आणि तीच निराशा येण्याची चिन्हे आहेत. डहाणू-मुंबई लोकल सेवा सध्या पूर्णपणे अपुरी ठरत असून, दररोज हजारो प्रवासी अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. लोकलमध्ये चढण्यासाठी होणारी जीवघेणी स्पर्धा आणि उतरताना होणारी चेंगराचेंगरी ही आता डहाणू लोकलची रोजची ओळख बनली आहे. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जाहीर होणारे पश्चिम रेल्वेचे उपनगरीय वेळापत्रक यंदा मार्चपर्यंत लांबणीवर पडले आहे. या नवीन वेळापत्रकात तरी डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढतील का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. उपनगरीय रेल्वे घोषित होऊन अनेक वर्षे उलटली तरी डहाणू पट्ट्यातील प्रवाशांना मिळणारी वागणूक दुजाभावाचीच असल्याचे दिसून येते.

उपनगरीय रेल्वे घोषित करून अनेक वर्षे लोटली तरी डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात पश्चिम रेल्वे प्रशासन उदासीनच आहे. दर नवीन वर्षाला वेळापत्रक जाहीर करताना डहाणू लोकलला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे येत्या नवीन वर्षात तरी डहाणू-मुंबई रेल्वे प्रवास सुसह्य होईल का, असा प्रश्न येथील रेल्वे प्रवासीवर्गाला पडला आहे. सध्या असलेली रेल्वे सेवा प्रवाशांच्या संख्येला अपुरी ठरत असून, दररोज हजारो नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी व रुग्णांचे हाल होत आहेत. विशेषतः सकाळी व संध्याकाळी कामांच्या वेळेत डहाणू रोडहून सुटणाऱ्या व येणाऱ्या लोकलमध्ये अक्षरशः पाय ठेवायलाही जागा उरत नाही.

नोकारदार वर्गाला रोज लेटमार्क
तारापूर, डहाणू, तलासरी, उंबरगाव परिसरातील औद्योगिक व शैक्षणिक संधींमुळे प्रवासी संख्या झपाट्याने वाढली आहे; मात्र लोकल फेऱ्यांची संख्या, डबे व वेळापत्रकात अपेक्षित बदल न झाल्याने प्रवाशांचा ताण वाढतच आहे. अनेकदा लोकल रद्द होणे, उशिराने धावणे किंवा मध्येच थांबवणे यामुळे कार्यालयीन वेळा बिघडतात. महिला-विद्यार्थ्यांची कोंडी कायम आहे. सकाळी नोकरदारांसह कॉलेज-शाळांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच कामावर जाणाऱ्या महिलांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. १२ डब्याच्या डहाणू लोकलच्या महिला डब्यांमध्येही क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होते. अशात अपघाताचा धोका, चेंगराचेंगरी आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

प्रवाशांचे अतोनात हाल
सकाळी येथील नोकरदारांसाठी महत्त्वपूर्ण असलेली डबल डेकर फ्लाइंग राणी एक्स्प्रेस आणि वलसाड फास्ट पॅसेंजर या गाड्या सिंगल डेकर केल्याने यातून प्रवास करताना प्रवासीवर्गाचे अतोनात हाल होत आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये डहाणू ते विरार व चर्चगेट अशा सुमारे २० लोकल सेवा आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्या पकडून दिवसांत केवळ ५० फेऱ्या आहेत. लोकल सेवांच्या बाबतीत येथील प्रवासीवर्गावर दुजाभाव कायम आहे, असे रेल्वे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.

लोकप्रतिनिधी, संघटनांचा दबाव
प्रवासी संघटना व स्थानिक लोकप्रतिनिधींकडून रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने निवेदने दिली जात आहेत. नवीन वर्षात तरी डहाणूकरांना दिलासा द्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे; मात्र प्रत्यक्षात निर्णय कधी होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. याउलट रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक अडचणी, मार्गक्षमता आणि वेळापत्रकाचा अभ्यास सुरू आहे, असे नेहमीचे उत्तर दिले जाते; पण प्रत्यक्षात प्रवाशांना दिलासा देणारे ठोस पाऊल अद्याप दिसून आलेले नाही.


येत्या १ जानेवारीपासून मेल/एक्स्प्रेसच्या वेळापत्रकानुसार काही गाड्यांची वेळ पाच-सात मिनिटांनी बदलेली आहे‌. यामुळे उपनगरीय गाड्या सायडिंगला काढण्याचे प्रमाण वाढणार आहे. मार्चअखेरीस उपनगरीय वेळापत्रकात तरी किमान दिलासा मिळेल, अशी अपेक्षा.
- ॲड. प्रथमेश प्रभुतेंडोलकर, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

प्रवाशांच्या प्रमुख मागण्या
* डहाणू-मुंबई लोकल फेऱ्यांत वाढ
* सकाळ-संध्याकाळी अतिरिक्त ‘पीक अवर’ लोकल
* १२ डब्यांच्या लोकलऐवजी १५ डबे
* एक्स्प्रेस गाड्यांचे अधिक थांबे
* वेळापत्रक शिस्तबद्ध करणे

आता असलेल्या सेवा
लोकल - २१ अप २१ डाऊन
शटल/पेसंजर- ६ अप ६ डाऊन
मेमू- ६ अप ६ डाऊन
एकूण - ३३ अप ३३ डाऊन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Political Breaking : बराटे, शिवरकर यांची भाजप मध्ये एन्ट्री; वानवडीमध्ये राजकीय ट्विस्ट!

Crime: तरुणीनं प्रियकराला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला; प्रेयसीला राग अनावर, क्रीडांगणात गाठलं अन्..., काय घडलं?

Dharashiv Agriculture : येरमाळ्याच्या तरुण शेतकऱ्याची कमाल; घरच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करून इराक निर्यातीत यश!

Motor Vehicle Rules: दहा वर्षांची गाडी समजणार जुनी; 'फिटनेस फी' दहा पटींपर्यंत वाढली, केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा!

Indian Railway: सण-उत्सवात रेल्वेचा मोठा हातभार; वर्षभरात ४३ हजारांहून अधिक विशेष गाड्या!

SCROLL FOR NEXT