मुंबई

बिर्ला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी

CD

‘आविष्कार’त बिर्ला महाविद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी
कल्याण, ता. २८ (वार्ताहर) : मुंबई विद्यापीठाच्या ‘आविष्कार’ आंतरमहाविद्यालयीन संशोधन अधिवेशनात कल्याण येथील बी. के. बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध प्रवर्गांत सुवर्णपदकासह उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची मान उंचावली आहे.
या संशोधन अधिवेशनात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदव्युत्तर प्रवर्गात (कॅटगरी ५) बी. के. बिर्ला महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. या विजयी संघात संस्कार गायकवाड, रुशिका खवास, दर्शना सिंग, रिंकी शर्मा आणि आदित्य नाईकवाडी यांचा समावेश होता. या संघाला प्रा. राजेश्वरी मिस्त्री यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर, एमएस्सी एआय (भाग २) चे विद्यार्थी यश देवऱुखकर आणि प्रसाद साबळे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. त्यांना प्रा. कल्पेश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. भौतिकशास्त्र विभागातील एमएस्सीचे विद्यार्थी सौरभ मोकाशी यांनी अंतिम फेरीत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवून महाविद्यालयाच्या यशात भर घातली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

आता मजा येणार ! मानिनीने केली रम्या आणि वसू आत्याच्या कारस्थानची पोलखोल ; प्रेक्षक झाले खुश

Pune crime cctv: पुणं हादरलं! मित्राची थट्टा केली म्हणून आला राग, सपासप वार करत केला खून! सीसीटीव्ही व्हायरल

SCROLL FOR NEXT