मुंबई

उड्डाणपुलावर दोन कारचा अपघात

CD

उड्डाणपुलावर दोन कारचा अपघात
सुदैवाने जीवितहानी टळली; महामार्गावरील खड्डे कारणीभूत असल्याचा आरोप
कासा, ता. २७ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी उड्डाणपुलावर (गुजरात–मुंबई लेन) शुक्रवारी सकाळी दोन कारमध्ये झालेल्या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. सकाळी सुमारे ९. २५ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही.
मारुती स्विफ्ट डिझायर (क्रमांक एमएच ४८ डीसी ५२२०) ही कार गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या टोयोटा फॉर्च्युनर (क्रमांक जीजे ०२ बीएच ५५५७) या कारने स्विफ्ट डिझायरला जोरदार धडक दिली. स्विफ्ट डिझायर गाडी रितिक कुमार मिश्रा (वय २३, रा. नवी मुंबई) चालवत होते, तर फॉर्च्युनर कार पंकज पाटणकर (वय ४०, रा. कराड) यांच्या ताब्यात होती. धडकेमुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, महालक्ष्मी उड्डाणपुलावरील रस्त्याची दयनीय अवस्था पुन्हा एकदा या अपघातामुळे समोर आली आहे. उड्डाणपुलावर अनेक ठिकाणी लोखंडी रॉड बाहेर आलेले, तसेच मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने वाहनचालकांना अचानक ब्रेक दाबावा लागत आहे. विशेषतः सकाळच्या वर्दळीच्या वेळी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत असून, वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातग्रस्त दोन्ही वाहने त्वरीत रस्त्याच्या बाजूला काढण्यात आली, त्यामुळे काही वेळातच वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या अपघातप्रकरणी पुढील चौकशी व कायदेशीर कारवाई कासा पोलिस ठाण्याच्या वतीने सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

Latest Marathi News Live Update: राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी वन आणि खाण विभागाची आढावा बैठक घेतली

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा जुना फोटो काँग्रेस नेत्याने केला व्हायरल; शपथविधी सोहळा अन् जमिनीवर बसलेले मोदी

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकच उमेदवार ३ पक्षांकडून करत आहे अर्ज!

Team India U19: आयसीसी U-19 वर्ल्डकप आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; कर्णधारपदाची धुरा कुणाकडे?

SCROLL FOR NEXT