मुंबई

वसईच्या एकोप्याचे प्रतीक

CD

वसईच्या एकोप्याचे प्रतीक
कला-क्रीडा महोत्सवाबाबत बिशप थॉमस डिसोझा यांचे वक्तव्य

विरार, ता. २७ (बातमीदार) : कला-क्रीडा महोत्सवात आपण जात, पात, धर्म विसरून एकत्र येत असतो. देवाने कला आणि क्रीडा ही मानवाला दिलेली देणगी आहे. हा महोत्सव हे वसईच्या एकोप्याचे प्रतीक आहे. ही सांस्कृतिक चळवळ गेली ३६ वर्षे सुरू असून अशीच पुढे सुरू राहावी, असे उद्गार वसई धर्म प्रांताचे आर्च बिशप थॉमस डिसोझा यांनी काढले. ३६व्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डिसोझा यांनी कला-क्रीडा महोत्सवाचे पहिले कार्याध्यक्ष मुकेश सावे यांचे स्मरण केले. कार्यक्रमाला दिग्दर्शक आणि अभिनेते अमोल गुप्ते, प्रशिक्षक दिनेश लाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यंदा महोत्सवात ६० हजार खेळाडू आहेत. ५०व्या वर्षी ते एक लाख होवोत, अशी अपेक्षा डिसोझा यांनी व्यक्त केली.
सिने दिग्दर्शक अमोल गुप्ते म्हणाले, की या कला-क्रीडा महोत्सवात आतापर्यंत मी १० वेळा आलो आहे. हे माझे घर झाले आहे. येथील स्पर्धकांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. तर दिनेश लाड म्हणाले, की वसईमध्ये खूप प्रतिभा आहे. मुख्य म्हणजे या ठिकाणी क्रिकेट सोडून सर्व देशी खेळ आहेत. हा महोत्सव पाहून २०३६च्या ऑलिम्पिकमध्ये येथील खेळाडू खेळताना दिसतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

महोत्सवाची ज्योत प्रज्वलित

वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाची ज्योत प्रज्वलन शुक्रवारी दुपारी विरार येथील सावरकरांच्या पुतळ्याजवळ माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले. संपूर्ण वसईत फिरून ही क्रीडा ज्योत संध्याकाळी नरवीर चिमाजी आप्पा मैदानात आली. त्यानंतर या क्रीडा ज्योतीने मैदानावरील क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सचिव केवल वर्तक यांनी महोत्सवाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमात महोत्सवाचे पहिले कार्याध्यक्ष मुकेश सावे यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT