मुंबई

भाचीचे बारसे पडले मामाला साडेपाच लाखांना

CD

घराचे कुलूप उचकटून लाखोंचा ऐवज चोरीला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : कळवा येथे घरफोडीत लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. घराचे कुलूप कोंयडा उचकटून चोरट्याने साडेपाच लाखांहून अधिक रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
कळवा येथील तक्रारदार गुरुवारी (ता. २५) बारशाच्या कार्यक्रमनिमित्त बाहेर गेले होते. उशिर झाल्याने ते उलवे येथे नातेवाईकांकडे राहिले. शुक्रवारी (ता. २६) घरमालकाने त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. घरी आल्यावर चोरट्यांनी कडीकोंयडा उचकटून घरातील तीन लाख ८५ हजारांचे पाच तोळे पाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ८४ हजारांचे एक तोळे दोन ग्रॅमचे दुसरे सोन्याचे मंगळसूत्र, ४२ हजारांचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दोन जोड, २१ हजारांचे ३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील पट्या, १४ हजारांचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान, १४ हजारांचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याची एक डवली व दोन मणी असा पाच लाख ६० हजारांचा सोन्याचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT