मुंबई

निवडणुकीनंतर पोलिस भरतीचे रणांगण

CD

ठाण्यात पोलिस भरतीचा महासंग्राम
एका जागेसाठी ३२ उमेदवार मैदानात; निवडणुकीनंतर मैदानी चाचण्यांना वेग

पंकज रोडेकर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ ः राज्यात सरकारी नोकरीची ओढ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील रिक्त जागांसाठी हजारो तरुणांनी अर्ज केल्याने यंदा भरतीचे मैदान चांगलेच गाजणार आहे. शहर पोलिस दलातील एका जागेसाठी ३२, तर ग्रामीणमध्ये २८ उमेदवार रिंगणात नशीब अजमावणार आहेत. ठाणे शहर पोलिस दलातील ६५४ जागांसाठी तब्बल २१ हजार दोन अर्ज ऑनलाइन दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे ठाणे ग्रामीण पोलिस दलात १६७ जागांसाठी चार हजार ७०० अर्ज प्राप्त झाले आहे. यावरून सरकारी नोकरीची क्रेझ पुन्हा एकदा दिसून आली आहे.

दरवर्षीप्रमाणे रिक्त होणाऱ्या जागांसाठी पोलिस दलात भरती प्रक्रिया राबविण्यात येते. यावर्षीही या भरती प्रक्रियेचा श्रीगणेशा झाला असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार, शहर पोलिस दलातील एका जागेसाठी ३२ उमेदवार रिंगणात आहेत. तर ग्रामीणमध्ये एका जागेसाठी २८ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. यामुळे स्पर्धेचा स्तर कमालीचा वाढला आहे. सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर, म्हणजेच २० जानेवारी २०२६ पासून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी पोलिस प्रशासनाने तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे.

उच्चशिक्षितांचाही ओढा
गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही पोलिस शिपाईपदासाठी उच्चशिक्षित उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केल्याची शक्यता आहे. स्थिर सरकारी नोकरीची हमी आणि पोलिस दलात काम करून समाजसेवेची संधी, यामुळे पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांचा ओढा वाढला आहे.

उमेदवारांसाठी कठीण कस
वाढत्या स्पर्धेमुळे केवळ लेखी परीक्षाच नाही, तर मैदानी चाचणीतही गुणांची मोठी चुरस पाहायला मिळेल. दमछाक करणाऱ्या शारीरिक चाचण्या आणि त्यानंतर होणारी लेखी परीक्षा पार करण्यासाठी उमेदवारांना तगडा फिटनेस आणि मानसिक तयारी ठेवावी लागणार आहे.

अर्जांचा पाऊस
पोलिस दल रिक्त जागा एकूण अर्ज एका जागेसाठी सरासरी
ठाणे शहर ६५४ २१,००२ ३२ उमेदवार
ठाणे ग्रामीण १६७ ४,७०० २८ उमेदवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Election : पुण्यात मोठा ट्विस्ट! मनपा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार? उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

Municipal Elections 2025 : अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक; जागावाटपावरून युती-आघाडीत वाद; बैठकांवर बैठका, पण तोडगा निघेना, घोडं अडलंय कुठं?

Navneet Rana यांचा Thackeray वर घणाघात, 'उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला' | Sakal News

Akola Municipal Election 2025 : ठरलं! अकोल्यात शरद पवार गट अन् काँग्रेसची युती; ठाकरे गटाची भूमिका अजूनही गुलदस्त्यात

Vijayanagara Empire Heritage Site : विजयनगरचे वैभव आणि किष्किंधेचा इतिहास; सोलो ट्रिपमधून उलगडलेले हंपीचे सौंदर्य

SCROLL FOR NEXT