मुंबई

माथेरान रस्त्याची डागडुजी एका रात्रीत उखडली

CD

माथेरान रस्त्याची डागडुजी एका रात्रीत उखडली
ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; पर्यटकांचे हाल
कर्जत, ता. २७ (बातमीदार) ः तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानकडे जाणाऱ्या नेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा निकृष्ट दर्जा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. २३ डिसेंबर रोजी करण्यात आलेली डागडुजी अवघ्या एका रात्रीत उखडून निघाल्याने संबंधित ठेकेदाराच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
दुरुस्तीच्या दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर टाकलेले डांबर आणि खडी वेगळी होऊन संपूर्ण रस्त्यावर पसरलेली दिसून आली. परिणामी वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून वाहनांची चाके घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. नेरळ-माथेरान घाट रस्त्याची अवस्था याआधीच अतिशय खराब होती. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले होते. त्यावर करण्यात आलेली ही तात्पुरती व अपुरी डागडुजी अधिक त्रासदायक ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि चालकांकडून केला जात आहे. दुरुस्तीच्या नावाखाली अत्यंत नगण्य प्रमाणात कारपेट टाकण्यात आले असून, डांबर टाकण्याच्या मूलभूत नियमांकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. केवळ तीन-चार ठिकाणी खड्डे भरून थातूरमातूर काम उरकण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. निकृष्ट दर्जाचे काम सुरू असतानाही संबंधित यंत्रणांनी डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकाराबाबत नेरळ-माथेरान टॅक्सी चालक-मालक संघटनेने आक्रमक भूमिका घेत ठेकेदाराला धारेवर धरले असून, रस्त्यावर पसरलेली उखडलेली खडी तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे.नववर्षाच्या सुट्यांच्या पार्श्वभूमीवर माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होत आहेत. अशा पर्यटन हंगामात रस्त्याची ही अवस्था अत्यंत गंभीर असून तातडीने दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : आखाती युद्धाचा फटका; टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT