मुंबई

डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा प्रदूषणाचा उद्रेक

CD

डोंबिवली एमआयडीसी परिसरात नारंगी धूर
फेज २ मधील चेंबरमधून प्रदूषण
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ ः डोंबिवली एमआयडीसी परिसरात पुन्हा एकदा प्रदूषणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. फेज २ मधील एका चेंबरमधून अचानक नारंगी रंगाचा दाट धूर बाहेर पडल्याने परिसरात खळबळ उडाली. हा धूर चेंबरच्या आजूबाजूच्या भागात पसरला असून, परिसर नारंगी रंगाने झाकल्यासारखा दिसत होता. या धुराला तीव्र आणि उग्र वास येत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली. धुराच्या संपर्कात आल्यामुळे डोळे जळजळणे, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. आरोग्याच्या दृष्टीने ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे.

तीव्र संताप
डोंबिवली एमआयडीसी परिसरात यापूर्वीही अनेक वेळा वायू व जलप्रदूषणाचे प्रकार उघडकीस आले आहेत. औद्योगिक सांडपाणी, रासायनिक वायू आणि बेकायदा प्रक्रिया यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. तरीही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

एमआयडीसीतील प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, असा सवाल स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे. प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT