एसआयआयएलसी
इन्स्टंट लिक्विड ग्रेव्ही व्यावसायिक कार्यशाळा
रेडी टू कुक इन्स्टंट खाद्यपदार्थांना सध्याच्या धावपळीच्या युगात खूप महत्त्व आले आहे. दैनंदिन गरजेमुळे बाजारपेठेमध्ये या पदार्थांना मागणी असल्याने या क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यास संधी आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक स्वरूपातील एकदिवसीय कार्यशाळा ३ जानेवारीला होणार आहे. यामध्ये पंजाबी रेड, हैदराबादी, व्हाईट, फिश करी, महाराष्ट्रीयन, सावजी, साऊथ इंडियन या ग्रेव्ही तसेच इडली-डोसा पीठ, आले-लसूण पेस्ट व कोल्हापुरी तांबडा व पांढरा रस्सा हे पदार्थ प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहेत. तसेच याचा व्यवसाय कसा उभारावा, उपलब्ध बाजारपेठ, पॅकेजिंग, लेबलिंग, कॉस्टिंग, मार्केटिंग, फायनान्स आदींची माहिती दिली जाणार आहे.
सरकारी कंत्राटांमध्ये व्यवसायाची संधी
विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-निविदा प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण ४ व ५ जानेवारीला होणार आहे. प्रशिक्षणात विविध विभागांतील नोंदणी, न दिसणाऱ्या निविदासुद्धा कशा शोधायच्या, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, निविदा भरण्यास लागणारी कागदपत्रे, डिजिटली सही करून कागदपत्रे कशी सादर करायची, ईएमडी व एसडीमध्ये सूट कशी मिळवायची, स्वतःकडे मशिनरी नसतील तर करावयाचे भाडे करार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
सरकारी इस्टिमेशन प्रशिक्षण
शासकीय कामांचे मूल्यनिर्धारण, इस्टिमेशन हे बांधकाम, स्थापत्य विभागातील, कंत्राटदार, विद्यार्थी तसेच अभियंता, पर्यवेक्षक व शासकीय अधिकारी यांना उपयुक्त असे ऑनलाइन प्रशिक्षण ५ जानेवारीला आयोजिले आहे. प्रशिक्षणात सार्वजनिक बांधकाम विभाग, एसएसआर, रेट, नियमावली, टेस्टिंग, व्यवस्थापन पत्रक, रेट तपासणी, चार्ट, इस्टिमेशन सॉफ्टवेअर व इस्टिमेशन बनविणे, तयार करणे, समाजमंदिर, सभामंडप, शाळा, अंगणवाडी, सुरक्षा भिंत अशा प्रकारची कामे व इस्टिमेशन आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. या प्रशिक्षणामुळे सहभागींना प्रत्यक्ष कामकाजातील कौशल्य, खर्च नियंत्रण आणि तांत्रिक ज्ञान अधिक प्रभावीरीत्या आत्मसात करण्यास मदत होईल.
‘एआय मास्टरक्लास’ ऑनलाइन प्रशिक्षण
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक प्रगती साधू इच्छिणाऱ्या प्रोफेशनल्स आणि उद्योजकांसाठी ‘एआय मास्टरक्लास’ हे विशेष ऑनलाइन प्रशिक्षण ११ जानेवारीपासून आयोजिले आहे. यामध्ये चॅटजीपीटी आणि इतर कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा वापर करून आपल्या व्यवसायासाठी उपयुक्त माहिती, कल्पना आणि रणनीती कशा तयार करायच्या, तसेच आकर्षक बिझनेस प्रेझेंटेशन, मार्केटिंग मटेरियल (जाहिराती, कॅम्पेन कंटेंट), सोशल मीडियासाठी पोस्ट्स, रिपोर्ट तयार करण्याचे कौशल्य, बिझनेस मॉडेल्स तयार करण्याच्या पद्धती आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. रिअल-लाइफ केस स्टडीज आणि लाइव्ह अॅक्टिव्हिटीजद्वारे प्रत्यक्ष अनुभवाला यामध्ये प्राधान्य देण्यात येईल. प्रशिक्षणातून सहभागींची उत्पादकता वाढेल, कमी वेळेत अधिक काम पूर्ण करता येईल आणि व्यवसायातील मार्केटिंग, सेल्स व कस्टमर सर्व्हिसमध्ये वेगाने प्रगती साधता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून स्पर्धेत पुढे जाण्याची ही संधी उपयुक्त आहे.
एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२, ९१४६०३८०३१. क्यूआर कोड : पीएफए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.