मुंबई

मनसे पुरस्कृत अपक्ष नगरसेवक प्रभाकर जाधव यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

CD

नगरसेवक प्रभाकर जाधव यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : डोंबिवली निळजे-कोळे परिसरातील मनसे पुरस्कृत अपक्ष नगरसेवक प्रभाकर जाधव यांनी रविवारी (ता. २८) शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
निळजे-कोळे परिसरातील विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करता येईल, या विश्वासातून आपण शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे जाधव यांनी सांगितले. आमदार राजेश मोरे यांनी सांगितले, की प्रभाकर जाधव यांचा जनसंपर्क आणि स्थानिक पातळीवरील कामाचा अनुभव शिवसेनेला निश्चितच बळ देणारा ठरेल. तर जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष असून, जाधव यांच्या प्रवेशामुळे डोंबिवली पूर्व परिसरात पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : नागपूर–मुंबई महामार्गावर भीषण अपघात; राँग साइडने आलेल्या कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT