बदलापूर, ता. २८ (बातमीदार) : बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे सोमवारी सकाळी रुचिता घोरपडे अधिकृतपणे हाती घेणार आहेत. बदलापूरकरांच्या उपस्थितीत आणि मतदारांच्या साक्षीने त्या पालिका कार्यालयात प्रवेश करून नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहे. हा क्षण बदलापूरच्या राजकीय व प्रशासकीय इतिहासातील महत्त्वाचा ठरणार आहे.
ज्यांनी आपल्यावर विश्वास दाखवत स्पष्ट कौल दिला, त्या तमाम बदलापूरकरांसमोरच पदभार स्वीकारत असल्याचा अभिमान व्यक्त केला. या ऐतिहासिकप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साक्षीदार व्हावे, असे आवाहन रुचिता घोरपडे यांनी नागरिकांना केले आहे. नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना लोकांच्या अपेक्षा, विश्वास आणि आश्वासनांना न्याय देण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. पदभार स्वीकारताच शहरातील प्रलंबित आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे घोरपडे यांनी स्पष्ट केले. विशेषतः शहरातील कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी उघड्या घंटागाड्या बंद करणे, चौक, रस्ते आणि मोकळ्या जागांमध्ये साचणारी कचऱ्याची घाण कायमस्वरूपी दूर करणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. स्वच्छता, शिस्त आणि सर्वांगीण विकास या त्रिसूत्रीवर बदलापूरच्या विकासाचा आराखडा राबवला जाईल, असा विश्वास बदलापूरकरांकडून व्यक्त होत आहे.
करात सवलत
यासोबतच घरपट्टी कर भरणाऱ्या नागरिकांना दिलासा देत करामध्ये ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून शहरातील करभरणा प्रक्रियेतही सकारात्मक बदल अपेक्षित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.