मुंबई

पक्षांतर केलेल्यांसाठी मनसेचे दारं बंद - मनसे नेते राजू पाटील

CD

पक्षांतर केलेल्यांचे पुन्हा मनसे प्रवेशासाठी प्रयत्न
आमची दारे बंद ः राजू पाटील यांचे वक्तव्य
कल्याण, ता. २९ (वार्ताहर) : मनसेमधील जे पैसे घेऊन दुसऱ्या पक्षात गेले त्यांचे आता फोन येत आहेत आम्हाला परत घ्या, परंतु त्यांच्यासाठी आमचे दरवाजे कायमचे बंद झाले असल्याचे मनसे नेते राजू पाटील यांनी सांगितले.कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवणुकीसाठी ठाकरे पक्ष आणि मनसेची युती झाली असून त्याबाबतचे जागावाटप देखील निश्चित झाले आहे. रविवारी (ता.२८) संध्याकाळपासून उमेदवारांना एबी फॉर्म वाटायला सुरुवात झाल्याची माहिती मनसे नेते राजू पाटील यांनी दिली.
सर्व जागांवर आमचे उमेदवार अंतिम झाले असून जागावाटप निश्चित झाले आहे. सेना-भाजपाची युती शब्दशः झाली आहे, मात्र मनातून तुटली आहे. दोन दिवसांत बघा काय काय होते. आमच्यातले जे पैसे घेऊन दुसऱ्या पक्षात गेले त्यांचे आता फोन येत आहेत आम्हाला परत घ्या, परंतु त्यांच्यासाठी आमचे दरवाजे कायमचे बंद झाले असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले. शिंदे गट-भाजपावाल्यांनी निवडणुकीअगोदरच चढाओढीने आयात केलेले काही लोकं आहेत. पैसे देऊन केले असतील किंवा काही लोकांना भीती दाखवून केले असेल त्यांचा उद्रेक होणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, जैन मुनींनी त्यांचे काम करावे राजकीय पक्षांच्या सुपाऱ्या घेऊ नये. साधूसंत पवित्र काम करत असतात, त्यांनी राजकारणात पडू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

राज-उध्दव ठाकरेंची संयुक्त सभा
कल्याण-डोंबिवली १२२ जागांपैकी ५४ ते ५५ जागा मनसेसाठी राखीव ठेवल्या आहेत. इतर जागांमध्ये ठाकरे गट आणि महाविकास आघाडी आपले उमेदवार देणार आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा कल्याण डोंबिवलीत होणार असून १२२ पैकी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येऊन आमचा महापौर बसेल, असा विश्वास राजू पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Harish Rana Euthanasia: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालं होतं? इच्छामरण म्हणजे काय? भारतात कायदा काय सांगतो अन् कोणते देश मान्यता देतात?

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

SCROLL FOR NEXT