मुंबई

अश्लील फोटो व्हायरल करण्याच्या भीतीने अत्याचार

CD

नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : सांगली जिल्ह्यात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणाने समाजमाध्यमावरून २५ वर्षीय विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून अश्लील फोटो व व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रवीण पाटील (वय ३२) असे त्याचे नाव असून, याच्याविरोधात एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केल्याची माहिती उपनिरीक्षक नंदकिशोर पाटील यांनी दिली.

पीडित विवाहित महिला तुर्भे येथे पती व मुलासह वास्तव्यास आहे, तर प्रवीण आणि पीडितेचा पती हे एकाच गावातील आहेत. वर्षभरापूर्वी आरोपीने समाजमाध्यमाद्वारे महिलेशी संपर्क साधत ओळख वाढवली. ही ओळख पुढे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमसंबंधात बदलली. त्यानंतर तरुणाने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. यादरम्यान त्याने मोबाईलवर तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ चित्रित केले. यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा शारीरिक संबंध ठेवले. याशिवाय तिला शिवीगाळ, मारहाण करीत वारंवार फोन करून तिला मानसिक त्रास दिला. या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने गत आठवड्यात शिरवळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेथील पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून तो पुढील तपासासाठी एपीएमसी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला.

संशयिताचा मोबाईल जप्त
एपीएमसी पोलिसांनी आरोपीचा कॉल डिटेल रेकॉर्ड व लोकेशनच्या आधारे त्याचा शोध घेत त्याला २६ डिसेंबरला कोपरखैरणे येथून अटक केली. त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून, तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचेही पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

Pune Traffic News : पुणेकरांनो सावधान! वाहतूक पोलिसांचा बडगा; ३ वर्षांत ४२ लाख वाहनचालकांवर कारवाईचा 'रेकॉर्ड'

Rajgad Illegal Hunting : राजगड तालुक्यात चौशिंग्या हरिण शिकार प्रकरणी वनविभागाकडून चार जणांना अटक; आरोपींकडून हत्यारे व मांस जप्त!

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Pune News : ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांची बिनविरोध निवड; राज्य वकील परिषदेचे नेतृत्व पुन्हा पुण्याच्या हाती

SCROLL FOR NEXT