मुंबई

लोकसेवा करताना पदांपेक्षा कामाला अधिक महत्त्व

CD

लोकसेवा करताना पदांपेक्षा कामाला अधिक महत्त्व
आमदार महेंद्र दळवी यांचे प्रतिपादन; रोठ बुद्रुक येथे मोफत सायकलवाटप
रोहा, ता. २९ (बातमीदार) : राजकारण करताना केवळ पदे, सत्तास्थाने किंवा मान-सन्मान यांना महत्त्व न देता समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कष्ट यांना प्राधान्य दिले पाहिजे. लोकसेवेत पदांपेक्षा काम अधिक महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केले.
रोठ बुद्रुक येथे मैत्री प्रतिष्ठान व शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गावातील ३५ विद्यार्थ्यांना मोफत सायकलवाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी नितीन वारंगे यांचे उदाहरण देत सांगितले की, सामान्य कार्यकर्ता असतानाही त्यांनी पदाच्या मागे न लागता लोकहिताची कामे प्राधान्याने केली. युतीच्या माध्यमातून या गावात सातत्याने जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न सुरू असून, ग्रामपंचायत पातळीवरील विविध विकासकामे, मंदिर उद्घाटन तसेच सामाजिक उपक्रमांद्वारे लोकांशी थेट नाळ जोडली जात असल्याचे आमदार दळवी यांनी सांगितले. राजकारणातील अनेक प्रश्न हे चर्चा व संवादातूनच सुटू शकतात. मतभेद असले तरी संवाद कायम ठेवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. रोहा नगरपालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले तरी जनतेची साथ आजही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला शिवसेना नेते दिलीप उर्फ छोटम भोईर, तालुकाप्रमुख अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे, भाजप रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग, उपतालुकाप्रमुख संदेश मोरे, उद्देश वाडकर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, सुरेश महाबळे, महेश खांडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

Pune News : आयफोन विमा दावा नाकारल्याप्रकरणी ग्राहक आयोगाचा मोठा निर्णय; ८९ हजार परत करण्याचे आदेश

IND vs NAM : ७ षटकांत १०४ धावा चोपणारा भारत २०९ वर का अडकला? India vs Pakistan लढतीपूर्वी चिंता वाढवणारी गोष्ट

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

SCROLL FOR NEXT