उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांना निरोप
माणगाव, ता. २९ (वार्ताहर) : माणगाव उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून प्रदीर्घ काळ निष्ठावंत, प्रामाणिक आणि समाजाभिमुख सेवा बजावणारे पुष्कराज सूर्यवंशी यांनी सेवा-निवृत्ती स्वीकारली. पोलिस अधिकारी व कर्मचारी, व्यापारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या आदरभावनेने त्यांना भावपूर्ण निरोप दिला.
कर्तव्य बजावताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि पोलिस-जनता संबंध दृढ करणे, हे ध्येय ठेवून सूर्यवंशी यांनी कार्य केले. कठीण आणि तणावपूर्ण परिस्थितीतही शांतपणे निर्णय घेणारे अधिकारी म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या संयमित, धैर्यशील आणि प्रामाणिक कार्यपद्धतीची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वेळोवेळी त्यांचे कौतुक केले. नेहमी हसतमुख स्वभाव, माणुसकीची जाणीव आणि तक्रारदारांप्रती असलेली संवेदनशील भूमिका यामुळे ते सर्वसामान्य जनतेचे ‘आपले अधिकारी’ बनले होते. पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्याने पाहून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले. अनेक गुंतागुंतीचे व किचकट गुन्हे त्यांनी यशस्वीरीत्या उघडकीस आणले. माणगाव शहर व तालुक्यातील महामार्गावरील आंदोलन, वाहतूक कोंडी, वाढती अपघातांची संख्या, अनधिकृत बांधकामे, अवैध धंदे, जातीय सलोखा तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासारख्या संवेदनशील विषयांवर त्यांनी अत्यंत समतोल आणि जबाबदारीने कामगिरी बजावली. त्यामुळेच माणगावकरांच्या मनात त्यांनी विश्वासाचे व सुरक्षिततेचे स्थान निर्माण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.