वाशी, ता. २९ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे, मात्र जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील चर्चांचे फेरे सुरू असले तरी ठोस निर्णय न झाल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. त्यामुळे स्वपक्षाकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्यास इतर पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा ‘प्लॅन बी’ अनेकांनी तयार ठेवला आहे. काहींनी आवश्यक कागदपत्रे आणि तयारीही पूर्ण केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
वाशी येथील क्रिस्टल हाऊस येथे रविवारी (ता. २८) सायंकाळी महायुतीमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक, तसेच भाजपचे पदाधिकारी यांच्यात जवळपास दीड तास महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत महापालिका निवडणुकीतील जागावाटप, उमेदवार निश्चिती आणि पुढील राजकीय रणनीती यावर विचारविनिमय करण्यात आला. या बैठकीनंतर भाजपचे नवी मुंबई निवडणूक प्रभारी संजीव नाईक यांनी स्पष्ट केले की, भाजपकडून शिवसेने (शिंदे गट)समोर चार पर्यायांचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे, मात्र जर त्यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर भाजप स्वबळावर तब्बल १११ जागांवर निवडणूक लढवण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
संजीव नाईक यांनी स्पष्ट केले की, भाजपकडील १११ जागांवरील इच्छुक उमेदवार आधीच निश्चित करण्यात आले असून, पक्ष संघटनात्मकदृष्ट्या पूर्ण तयारीत आहे. त्यामुळे महायुती टिकेल की तुटेल, याबाबत अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे. शिवसेना आणि भाजपमधील अनेक इच्छुकांना अद्याप एबी अर्ज मिळालेले नाहीत. यामुळे स्थानिक पातळीवर तीव्र नाराजी व्यक्त होत असून, अनेक इच्छुकांनी उघडपणे अस्वस्थता दर्शविली आहेज
महायुतीसमोर नवीन डोकेदुखी
जर मोठ्या प्रमाणावर अपक्ष रिंगणात उतरले, तर त्याचा थेट फटका शिवसेना आणि भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपक्षांच्या वाढत्या संख्येमुळे मतांची विभागणी होऊन महायुतीसमोर नवी डोकेदुखी निर्माण होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील अस्थिरता, इच्छुकांची नाराजी आणि अपक्षांचा वाढता कल यामुळे राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.