मुंबई

बोईसरच्या एस टी एस शोरूम ला ग्राहक आयोगाची चपराक

CD

नवीन गाडीच्या नावाखाली विकली जुनी गाडी
पालघर, ता. २९ (बातमीदार) : नवीन कोरे वाहन असल्याचे सांगून ग्राहकाला अपघातग्रस्त (जुने) वाहन विकल्याप्रकरणी बोईसर येथील एसटीएस ऑटो प्रायव्हेट लिमिटेड या शोरूमला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने कडक चपराक लगावली आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकाला व्याजासह नुकसान भरपाई देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
२०१६ मध्ये निकेत वर्तक यांनी या शोरूममधून चारचाकी वाहन खरेदी केले होते. सर्व पैसे भरल्यानंतर जेव्हा ते वाहन घेण्यासाठी शोरूममध्ये गेले, तेव्हा त्यांना मिळालेले वाहन अपघातग्रस्त असल्याचे आणि त्यावर ओरखडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच वर्तक यांनी ग्राहक आयोगाकडे धाव घेतली होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, आयोगाच्या अध्यक्षा मंदाकिनी भोसले आणि सदस्य योगेश कापसे यांनी शोरूमला दोषी ठरवले. आयोगाने १३ लाख १५ हजार ६० रुपये आणि त्यावर १० टक्के व्याज, मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल २५ हजार रुपये, तक्रार खर्च १० हजार रुपये अशी भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
दुकानाच्या या गैरप्रकारामुळे ग्राहकाची झालेली फसवणूक आयोगाने गंभीरपणे घेतली असून, हा निकाल ग्राहकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

'बिग बॉसमध्ये गेल्यामुळे मेंदूला किडे लागले...' उषा नाडकर्णी म्हणाल्या...'मला त्यावेळी खूप त्रास...'

Latest Marathi News Live Update : दुबईत अडकलेल्या पुणेकरांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

Sangli Agents Stuck : इस्रायल–इराण संघर्षाच्या छायेत सांगलीतील १० विमा प्रतिनिधी दुबईत अडकले; एअर इंडियाचे उड्डाण रद्द

SCROLL FOR NEXT