मुंबई

शिवसंस्कार महोत्सव

CD

कल्याणामध्ये होणार शिवसंस्कार महोत्सव
कल्याण, ता. २९ (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काळातील मूल्ये आजच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने, कल्याण एज्युकेशन सोसायटी यांच्या के. सी. गांधी शाळेच्या आणि सईशा प्रॉडक्शन्स यांच्या वतीने ‘शिवसंस्कार महोत्सव २०२६’ हा पाच दिवसीय शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. कल्याण पश्चिमेतील के. सी. गांधी शाळेच्या प्रांगणात ६ ते १० जानेवारी दरम्यान हा कार्यक्रम पार पडणार आहे.
हा महोत्सव केवळ इतिहासाचे सादरीकरण नसून, आजच्या विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी आणि नागरिकांसाठी देशभक्ती, नेतृत्व, नीतिमत्ता, चारित्र्य आणि एकात्मतेची जाणीव करून देणारा अनुभवप्रधान उपक्रम आहे. गेली पंधरा वर्षे सईशा प्रॉडक्शन्स, मुंबई ही संस्था छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अनमोल वारसा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.

कलादालन मुख्य आकर्षण
शिवसंस्कार महोत्सव २०२६ अंतर्गत ‘शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालन’ हे या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. हे कलादालन दि. ६ ते १० जानेवारी २०२६ दरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत विद्यार्थ्यांसाठी आणि सायंकाळी ४.३० ते रात्री ८.०० या वेळेत नागरिकांसाठी शाळेच्या पटांगणात खुले राहणार आहे. या शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालनासाठी ज्या शाळांनी सकाळच्या वेळचे स्लॉट्स नोंदविले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पूर्णतः विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

Pune Election: सेम टू सेम आर्ची! पुण्याच्या निवडणुकीत आर्चीसारखी दिसणारी उमेदवार कोण?

LPG Subsidy : 'एलपीजी सबसिडी' बंद होणार?; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Latur Crime : अहमदपूर तहसील कार्यालयात बनावट सह्या, शिक्के वापरून फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

Pune Political : सूत्रे हलली, रात्रीत चित्र बदलले; कोथरूडमध्ये भाजपकडून ‘डॅमेज कंट्रोल’, उमेदवारांची फेररचना!

Test Team of 2025: या वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघात शुभमन गिलसह चार भारतीयांना स्थान, तर टेंबा बाबुमा कर्णधार

SCROLL FOR NEXT