अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा
‘टेककनेक्ट २०२६’मध्ये कौशल्य विकासाची संधी
मुंबई, ता. २८ : मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लायड सायन्सेस कल्याण येथील सेंटर ऑफ एक्सलन्स रोबोटिक्स व ऑटोमेशन आणि जान्यू टेक्नॉलॉजीज प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टेककनेक्ट २०२६’ या रोबोटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नवोन्मेष आणि प्रत्यक्ष अनुप्रयोगाधारित शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी वैयक्तिकरीत्या किंवा कमाल चार सदस्यांच्या संघामध्ये सहभाग नोंदवू शकतात. तसेच विविध अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांमध्ये आंतरविद्याशाखीय सहकार्याला विशेष प्रोत्साहनसुद्धा देण्यात आले आहे. स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिलेल्या समस्यांच्या यादीतून एक समस्या निवडून त्यावर रोबोटिक्स व ऑटोमेशनवर आधारित उपाय विकसित करावा लागणार आहे. निवडलेल्या समस्येवर जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्रकल्पाची संकल्पना, रचना, निर्मिती व प्रोग्रामिंग करण्यात येईल. प्रकल्पांचे मूल्यमापन उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व शैक्षणिक तज्ज्ञांच्या समितीमार्फत करण्यात येणार असून, अंतिम फेरीत विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागासाठी ३१ डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६पर्यंत नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ७९७७२११८२०/ ७९७२२४४५५९ या क्रमांकावंर संपर्क साधता येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
...
विषय असे
स्मार्ट कचरा व्यवस्थापन, स्वयंचलित नेव्हिगेशन प्रणाली, औद्योगिक सुरक्षा व स्वयंचलन उपाय, ऊर्जा कार्यक्षम रोबोटिक्स, आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्यासाठी रोबोटिक्स तसेच मलनिस्सारण वाहिनीसाठी स्मार्ट आयओटी निरीक्षण प्रणाली यांसारखे विषय निश्चित करण्यात आले आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके, उत्कृष्टतेची प्रमाणपत्रे तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय, विजयी व निवडक प्रकल्पांना उद्योग मंचावर सादर करण्याची संधी तसेच जान्यू टेक्नॉलॉजीज प्रा. लि. मध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.