मुंबई

ढेकाळे येथे महामार्गालगत आढळला मृतदेह

CD

ढेकाळे येथे महामार्गालगत आढळला मृतदेह
मनोर, ता.२९ (बातमीदार) : ढेकाळे गावाच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत अनमोल नर्सरीच्या मागील बाजूस एक मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सोमवारी दुपारी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास कुजलेल्या अवस्थेतील हा पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच मनोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने या व्यक्तीचा मृत्यू महिनाभरापूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Donation Rules: 'हे' लोक रक्तदान करू शकत नाहीत, निर्बंध का? सर्वोच्च न्यायालयात सरकारचा खुलासा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Pune News: रुग्णालयांच्या अवाजवी बिलांना आता बसणार चाप; आरोग्यमंत्र्यांकडून ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ची महत्त्वपूर्ण घोषणा..

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, एनर्जी इतकी की तरुणांना सुद्धा लाजवेल, Viral Video

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

SCROLL FOR NEXT