मुंबई

धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्यांच्या सोनसाखळ्या चोरी

CD

सोनसाखळ्या चोरीप्रकरणी १३ महिलांना अटक
भाईंदर, ता. २९ (बातमीदार) : मिरा रोड येथे आयोजित पंडित प्रदीप मिश्रा यांच्या ‘श्री शिव महापुराण कथा’ कार्यक्रमात महिला भाविकांच्या सोनसाखळ्या चोरणाऱ्या एका मोठ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणी काशीगाव पोलिसांनी १३ महिलांना अटक केली असून, त्या सर्व वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
चेंबूर येथील शिवकुमार यादव यांच्या आईचा सोन्याचा हार पहिल्या दिवशी चोरीला गेला होता. त्यानंतर यादव यांनी दुसऱ्या दिवशी परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवले. ५-६ महिला एका महिला भक्ताला धक्काबुक्की करून तिची साखळी हिसकावताना त्यांना दिसल्या. यादव यांनी या घटनेचे चित्रण आपल्या मोबाईलमध्ये करून तत्काळ पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण शाखेने रविवारी (ता. २८ ) कार्यक्रमस्थळी आणि बस थांब्यांवर सापळा रचला. या वेळी गटागटाने चोरी करणाऱ्या १३ महिलांना रंगेहात पकडण्यात आले. गर्दीचा फायदा घेऊन या महिला दागिने चोरत होत्या. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

Dry Fruits Price Hike: बदाम, पिस्ता, खजुर महागले! युद्धजन्य परिस्थितीमुळे सुक्या मेव्याची आवक ठप्प, दरवाढ किती?

Horoscope : उद्या १४ मार्च 'या' ४ राशींसाठी ठरणार गेमचेंजर; शेअर्सची गुंतवणूक देईल लाखोंचा फायदा, करियर अन् वैवाहिक जीवनाला कलाटणी

Palghar Crime : पालघर हादरले! मजुराला झाडाला उलटे टांगून जखमांवर चोळले तिखट, विटभट्टी मालकावर गुन्हा दाखल

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

SCROLL FOR NEXT