मुंबई

काँग्रेस वंचित युती- नव्या समीकरणांची साखरपेरणी

CD

काँग्रेस वंचित युती- नव्या समीकरणांची साखरपेरणी

विनोद राऊत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये झालेल्या ऐतिहासिक युतीमधून काँग्रेस नेतृत्वाला पुढच्या राजकीय समीकरणाची साखरपेरणी करायची आहे. महाविकास आघाडीत ज्या पद्धतीने फाटाफूट सुरू आहे. भविष्यात त्याला पर्याय म्हणून काँग्रेस- वंचित युतीकडे पाहिले जात आहे.

मुंबई पालिकेसाठी काँग्रेस-वंचितची युती झाली. २५ वर्षांनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहे. दरवेळी निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही पक्षांमध्ये युतीसाठी चर्चा सुरू करणे, त्यानंतर एकमेकांवर जाहीर आरोप-प्रत्यारोप करणे, हा आतापर्यंतचा इतिहास बघता, या वेळी तेच घडेल, असे सर्वांना वाटत होते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमेकांबद्दलचा अविश्वास बघता, जागावाटपाची चर्चा यशस्वी करणे हे आव्हानात्मक होते; मात्र या वेळी कुठल्याही परिस्थितीत वंचितला सोबत घेण्याची इच्छाशक्ती काँग्रेसने दाखवली. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले. विशेष म्हणजे, या आघाडीची घोषणा मुंबई प्रदेश कार्यालयात न होता टिळक भवनात झाली. काँग्रेसने वंचितला मुंबईत सर्वच क्षेत्रात जागा सोडल्या आहेत. या जागांमध्ये बहुतांश राखीव जागांचा समावेश आहे. सध्या मुंबईत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी आपापली वेगळी चूल मांडली आहे. ठाकरे बंधूंनी आघाडी केली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येत आहेत. या वेळी एकाकी लढणाऱ्या काँग्रेसला वंचित आघाडीसोबत घेणे गरजेचे होते.

मुस्लिम, दलित मतांवर लक्ष
काँग्रेसची मुख्य लक्ष दलित, मुस्लिम, आदिवासी, वंचित घटकांवर आहे. या मतांमध्ये फाटाफूट न होऊ देणे, ही पक्षाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे मुंबईत झालेल्या या युतीमुळे एक वेगळा संदेश जाईल, यासोबत आम्हाला गृहीत धरू नका, असा संदेशही मित्र पक्षांना मिळेल, असे काँग्रेस नेतृत्वाला वाटते.

काँग्रेस पक्षाची पालिका निवडणुकीत लोकशाही व संविधानाची बांधिलकी ठेवणाऱ्या समविचारी पक्षांबरोबर घेऊन जाण्याची मनापासून इच्छा होती. त्यादृष्टीने वंचितसोबतची युती ही अत्यंत महत्त्वाची आहे.
- सचिन सावंत, काँग्रेस नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात भूकंप! बाजार उघडताच सेंसेक्स 1,600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

T20 World Cup: आज मिळणार पहिला फायलिस्ट! दक्षिण आफ्रिका - न्यूझीलंडमध्ये ईडन गार्डन्सवर रंगणार सेमीफायनल

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील डॉक्टर ताब्यात

Galli Brothers : दुबईतील गलाई बांधव सुरक्षित; युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण

Shahbaz Sharif Viral Post : 'कंडेम' लिहायच्या नादात लिहिलं 'कंडोम'! पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मोठी घोडचूक; 'तो' स्क्रीनशॉट होतोय जगभर व्हायरल

SCROLL FOR NEXT