मुंबई

ठक्कर बाप्पा योजनेचे ढिसाळ नियोजनाविरोधात सरपंच संघटनेचे आमरण उपोषण

CD

ठक्कर बाप्पा योजनेत अन्याय
जव्हारमध्ये सरपंच संघटनेचे आमरण उपोषण
जव्हार, ता. ३० (बातमीदार) : आदिवासी विकास योजनांमधील प्रशासकीय दिरंगाई आणि ठक्कर बाप्पा योजनेच्या निधी वाटपातील भेदभावाविरोधात जव्हार तालुक्यातील सरपंच संघटनेने सोमवारपासून (ता. २९) आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात निधी न देता ठरावीक ग्रामपंचायतींनाच झुकते माप दिले जात असल्याचा आरोप सरपंच संघटनेने केला आहे. यात ‘टक्केवारी’चे राजकारण चालत असल्याची टीका डेंगाचीमेटचे सरपंच कमळाकर धूम यांनी केली. प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे रस्ते, पाणी, आरोग्य आणि शाळा यांसारखी मूलभूत कामे रखडली असून, आदिवासी गावांचा विकास खुंटला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रस्ताव प्रलंबित राहत असल्याने सरपंचांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या उपोषणाला युवा आदिवासी संघ (जव्हार), मोखाडा सरपंच संघटना आणि आदिवासी विकास हक्क समितीसह अनेक सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिला आहे.
प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली असून, आंदोलनात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
-------------
जर सर्व ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणात विकास निधी दिला नाही गेला, तर अन्नत्याग सुरू केला जाईल. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही.
- एकनाथ दरोडा, अध्यक्ष, जव्हार तालुका सरपंच संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM KISAN 22nd Installment : महाराष्ट्रातील १.७० लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, एका चुकीमुळे थांबला २००० रुपयांचा हप्ता; नेमकं काय घडलं ?

Leopard inside ZP School : बछड्यांना घेऊन बिबट्या आला शाळेच्या आवारात.., मुलं झाली भयभीत, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Mumbai: “तू खालच्या जातीचा…”; ब्रेकअपनंतर टोमणे; मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन, प्रेयसीवर SC-ST कायद्यांतर्गत गुन्हा

चूक नसतानाही प्राचार्यांकडून सर्वांसमोर पाईपने मारहाण, अपमान जिव्हारी; १९ वर्षीय विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

Tom Bruce: सहसदस्य देश केवळ विश्वकरंडकापुरतेच मर्यादित; स्कॉटलंडच्या टॉम ब्रुसची खंत!

SCROLL FOR NEXT