मुंबई

धिंगाणा घालाल तर नववर्ष तुरुंगात

CD

धिंगाणा घालाल तर नववर्ष तुरुंगात
पालघर पोलिसांचा कडक इशारा
पालघर, ता. ३० : थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, पालघर जिल्हा पोलिसांनी हुल्लडबाजांना कडक इशारा दिला आहे. आनंद साजरा करा; पण कायदा हातात घेऊ नका; नियम मोडल्यास नवीन वर्षात कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिला आहे. पर्यटन जिल्हा असल्याने पालघरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत संपूर्ण जिल्ह्यावर पोलिसांची करडी नजर असेल. त्यासाठी ६८ अधिकारी आणि ४२७ कर्मचाऱ्यांसह विविध पथके तैनात आहेत. जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांतर्गत येणारे सर्व समुद्रकिनारे, रिसॉर्ट्स, महामार्ग आणि रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्यात आली आहे.

दंगा नियंत्रण पथक, महिला सुरक्षा पथक आणि साध्या वेशातील पोलिस गर्दीच्या ठिकाणी तैनात असतील. नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनवर पोलिसांची करडी नजर असेल. ड्रंक अँड ड्राइव्ह रोखण्यासाठी ठिकठिकाणी ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’द्वारे तपासणी केली जाईल. महिलांची छेडछाड किंवा अश्लील वर्तन करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रात्री ठरावीक वेळेनंतर मोठा आवाज, संगीत आणि फटाक्यांवर बंदी असेल. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, हुज्जत घालणे किंवा बेकायदा जमाव जमवणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. तसेच कोणतीही संशयास्पद बाब, गैरप्रकार किंवा अडचण आल्यास नागरिकांनी तत्काळ ‘डायल ११२’ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

कडक बंदोबस्त
३१ डिसेंबर आणि १ जानेवारीदरम्यान जिल्ह्यातील प्रमुख चौक, समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, महामार्ग, चौक, रेल्वे स्थानके आणि संवेदनशील भागात आणि गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी, वाहन तपासणी आणि गस्ती वाढवण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस ठाण्यांचे पथक, दंगा नियंत्रण पथक, महिला पोलिस व साध्या वेशातील पोलिस रस्त्यावर तपासणीसाठी राहणार आहेत.

पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य
पालघरमधील समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मांदियाळी असते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि गुप्त माहितीच्या आधारे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी आणि वाहन तपासणी मोहीम राबवली जाईल. नागरिकांनी नियमांचे पालन करून नववर्षाचे स्वागत करावे आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालघरचे पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांनी केले आहे.

६८ अधिकाऱ्यांसह ४२७ कर्मचारी तैनात
जिल्ह्यात जागोजागी नाकाबंदी, तपासणी नाके, गस्ती आणि सुरक्षेसाठी पोलिसांचा राबता राहणार आहे. जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचारीवर्ग पाळत ठेवून राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांनी सूचना केल्या आहेत. जिल्ह्यात ६८ अधिकाऱ्यांसह ४२७ कर्मचारी आणि विविध पथके यांचा बंदोबस्त असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Pune News: नागपूर खंडपीठाचा निर्णय! आरटीई प्रवेशातील अंतराची अट स्थगित; पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी, काय आहे आदेश..

Harish Rana : इंजिनिअर होण्याचं स्वप्न अपुरं… १३ वर्षे कोमात झुंजलेल्या मुलाला इच्छामरण; वडिलांच्या डोळ्यांत अश्रू, शब्दही थरथरले…

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

30-Year Journey of Homemade Spice Business: कांडप यंत्रातून उभा राहिला स्वादाचा प्रवास; परळीच्या जाधव मसाल्याची ३० वर्षांची परंपरा

SCROLL FOR NEXT