मुंबई

मतदारांना चारवेळा मतदान बंधनकारक!

CD

पनवेल, ता. ३० (बातमीदार) : पनवेल महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, चार सदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने प्रत्येक मतदाराला चार जणांना मतदान करावे लागणार आहे. हे चारही मतदान बंधनकारक आहे. एखाद्याने एक मतदान करून पुढील मतदान करण्यास नकार दिला किंवा असमर्थता दर्शविली, तर उपस्थितीत एजंटच्या उपस्थितीत मतदान केंद्राध्यक्ष शेवटचे बटण दाबतील, अशी तरतूद असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. २० प्रभाग तयार करून आले असून, मतदारांना ७८ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. १८ प्रभागांत चार नगरसेवक असतील, तर तीन प्रभागांत तीन नगरसेवक राहणार आहेत. प्रशासनाने मतदानाविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक मतदाराला चार मतदान करणे बंधनकारकच आहे. याविषयी अतिरिक्त आयुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले, की मतदान यंत्रावर एक मतदान केल्यानंतर पुढील चार मतदान करणेदेखील आवश्यक आहे. एखाद्याने एकच मतदान केले आणि पुढील तीन मतदान करण्यास नकार दिला, तर मतदान केंद्रावरील एजंटांच्या उपस्थितीत मतदान केंद्राध्यक्षाला शेवटचे मतदान करण्याचे अधिकार आहेत.

राजकीय पक्षांना क्रॉस वोटिंगची भीती
प्रभागरचनेनुसार एका वार्डातील सर्व उमेदवार निवडून आणणे, हे राजकीय पक्षांसमोरदेखील आव्हान आहे. एक ते दोन मोठे म्हणजेच संपूर्ण प्रभागात ओळख असणारे उमेदवार देऊन त्यांच्यावर दोन इतर उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी टाकायची, अशी व्यूहरचना केली जात आहे; मात्र त्यात राजकीय पक्षांना क्रॉस वोटिंगची भीती असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT