मुंबई

टोपल्या विक्रीतून आदिवासींना रोजगार

CD

टोकावडे, ता. ३० (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील ऐतिहासिक व प्रसिद्ध म्हसा यात्रा ३ जानेवारीपासून सुरू होत आहे. यात्रेनिमित्त तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाला मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. महिनाभर आधीपासूनच आदिवासी बांधव बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत.
मुरबाड तालुक्यातील आदिवासी कारागीर पारंपरिक पद्धतीने बांबूपासून रंगीत टोपल्या, सूप, करंटे, चाफ आदी वस्तू तयार करतात. कांदे, लसूण साठवण्यासाठी; तसेच कुक्कुटपालनासाठी वापरल्या जाणाऱ्या या वस्तूंना ग्रामीण भागात मोठी मागणी असते. विशेषतः म्हसा यात्रेत या रंगीत टोपल्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने ही यात्रा आदिवासींच्या उपजीविकेचा मुख्य आधार ठरते. महाराष्ट्रासह बाहेरील राज्यांतून हजारो भाविक येथे येतात. गुरांचा बाजार, धोंगड्या, कांबळ्या तसेच टोपल्यांचा मोठा बाजार ही यात्रेची प्रमुख आकर्षणे आहेत. बैल, म्हैस व इतर दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचेही चित्र असते.
खुटारवाडी, खपाची वाडी, रामपूर, वडाची वाडी, चिमणीची वाडी, डोंबरेवाडी आदी गावांतील आदिवासी बांधवांनी आपल्या कलाकुसरीचे नमुने तयार करण्यास महिनाभर आधीच सुरुवात केली आहे. रंगीत टोपल्या म्हसा यात्रेतच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने यात्रेकरू आवर्जून या टोपल्यांची खरेदी करतात. या कामात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होत असून, संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असतो. इतर दिवसांत रोजगारासाठी कसरत करावी लागणाऱ्या आदिवासी बांधवांना म्हसा यात्रेत मोठी संधी देत असते. चांगला दर मिळेल, या अपेक्षेने हे कारागीर मेहनत व कौशल्याने रंगीत टोपल्या तयार करण्यात गुंतले आहेत.

म्हसा यात्रेमुळे आम्हा आदिवासी बांधवांना वर्षातून एकदा रंगीत टोपल्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ मिळते. यात्रेनिमित्ताने आम्हाला चांगला रोजगार मिळतो.
- पांडुरंग दरवडा, बांबू कारागीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

हा आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डेचा नवरा; या ठिकाणी दणक्यात पार पडणार लग्न; हास्यजत्रेच्या कलाकारांनी केली पोलखोल

Latest Marathi News Live Update : उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे गोंधळाची परिस्थिती

युद्धामुळे तांदूळ निर्यातीला फटका; विदर्भाचा बासमती अन् आंबेमोहोर अडकला बंदरात, भावही घसरले...

SCROLL FOR NEXT