मुंबई

नववर्ष स्वागतासाठी कडेकोट बंदोबस्त

CD

उल्हासनगर, ता. ३० (वार्ताहर) : नववर्ष स्वागताच्या उत्साहात कायदा-सुव्यवस्थेला कुठलाही धक्का लागू नये, मद्यपान करून बेदरकार वाहन चालविणाऱ्यांवर आळा बसावा, यासाठी उल्हासनगरमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री पोलिस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री तब्बल ५५० पोलिस अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर उतरून संयुक्त कारवाई करणार आहेत, अशी माहिती सचिन गोरे यांनी दिली.
उल्हासनगर परिमंडळ-४ अंतर्गत ३१ डिसेंबरला सायंकाळपासून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या बंदोबस्तासाठी दोन सहाय्यक पोलिस आयुक्त, ४० अधिकारी आणि ५१० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या उल्हासनगर, मध्यवर्ती, विठ्ठलवाडी आणि हिललाईन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. नाकाबंदीदरम्यान संबंधित पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कोळी, संतोष आव्हाड, शंकर अवताडे, संदीप शिवले; तसेच वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेश शिरसाठ आणि अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालकांची ब्रेथ ऍनालायझरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. दारू पिऊन वाहन चालविणारे, तसेच वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

पेट्रोलिंग करणार
सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सतत पेट्रोलिंग असणार आहे. आदेशांचे उल्लंघन करणारे, हुल्लडबाजी करणारे, मद्यपान करून गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात तत्काळ कारवाई केली जाणार आहे. हॉटेल, बार, दुकाने व इतर आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. विहीत वेळेनंतर सुरू ठेवलेल्या आस्थापनांविरोधातही कठोर कारवाई केली जाईल.

कोम्बिंग ऑपरेशन
नववर्षाच्या रात्री शहरात शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येणार आहे. यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार आरोपी यांची विशेष तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी स्पष्ट केले आहे. नववर्ष साजरे करताना कायद्याचे पालन करा, सुरक्षिततेला प्राधान्य द्या, असे आवाहन केले आहे.

नववर्षाचा आनंद साजरा करताना कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होणार नाही, ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मद्यपान करून वाहन चालविणे, वेगमर्यादा ओलांडणे, हुल्लडबाजी व सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ३१ डिसेंबरच्या रात्री संपूर्ण परिमंडळात कडेकोट बंदोबस्त, नाकाबंदी, ब्रेथ ऍनालायझर तपासणी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबविले जाणार आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने नववर्षाचे स्वागत करावे; पोलिस प्रशासन तुमच्या सुरक्षेसाठी रात्रभर सज्ज आहे.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: सेम टू सेम आर्ची! पुण्याच्या निवडणुकीत आर्चीसारखी दिसणारी उमेदवार कोण?

LPG Subsidy : 'एलपीजी सबसिडी' बंद होणार?; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Latur Crime : अहमदपूर तहसील कार्यालयात बनावट सह्या, शिक्के वापरून फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

Pune Political : सूत्रे हलली, रात्रीत चित्र बदलले; कोथरूडमध्ये भाजपकडून ‘डॅमेज कंट्रोल’, उमेदवारांची फेररचना!

Test Team of 2025: या वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघात शुभमन गिलसह चार भारतीयांना स्थान, तर टेंबा बाबुमा कर्णधार

SCROLL FOR NEXT