विद्यार्थ्यांच्या रॅलीतून मतदार जनजागृतीचा जागर
कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : मतदानाबाबत जनजागृतीसाठी पालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यानुसार महापालिका क्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालय यामध्ये चित्रकला स्पर्धा, मतदान जनजागृतीची शपथ असे उपक्रम राबविण्यात आले.
मतदानाबाबतची जागरुकता जनमानसामध्ये अधिकाधिक वाढावी या दृष्टीकोनातून कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्वीप नोडल अधिकारी संजय जाधव आणि सहाय्यक अधिकारी विजय सरकटे यांच्याव्दारे विविध उपक्रम राबिवले जात आहेत. त्याप्रमाणे युवर वोट-युवर पॉवर, आपले मत-आपली जबाबदारी, अशा आशयाचे फलक हाती घेऊन शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेच्या परिसरात मतदान जनजागृतीपर रॅली काढल्या. या रॅलीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन मतदार जनजागृतीबाबत आपला संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी मतदार जनजागृती उपक्रमास आपला हातभार लावला.