मुंबई

येऊरमध्ये जल्लोषाला लगाम

CD

येऊरमध्ये जल्लोषाला लगाम
पार्ट्यांवर पोलिसांची ‘वॉच’
ठाणे, ता. ३० : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी येऊरच्या निसर्गरम्य परिसरात होणाऱ्या जल्लोषाला ठाणे पोलिसांनी लगाम घातला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊर परिसरात ध्वनी प्रदूषण आणि अनधिकृत पार्ट्या रोखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली असून, परिसरातील फार्महाउस आणि हॉटेलमालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६८ नुसार परिसरातील अनधिकृत बंगले, फार्महाउस, लॉन्स, हॉटेल्स आणि टर्फधारकांना नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे, की नियमांचे उल्लंघन झाल्यास ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून वापरली जाईल आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मधुबन-येऊर प्रवेशद्वारातून सायंकाळी ६ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना प्रवेश बंद राहील; मात्र यामध्ये स्थानिक रहिवासी, एअर फोर्स अधिकारी आणि कार्डधारकांना यातून सूट असेल. येऊरचा निसर्ग आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. विनापरवाना पार्ट्या किंवा गोंधळ घालणाऱ्या आयोजकांवर आणि व्यवस्थापकांवर तत्काळ गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांनी दिला आहे.

वन्यजीव आणि निसर्ग संरक्षणाला प्राधान्य
येऊर परिसर हा केंद्र सरकारने ‘ईको-सेन्सिटिव्ह झोन’ आणि शांतता क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. फटाके आणि मोठ्या आवाजामुळे येथील वन्यजीवांना त्रास होतो, ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी सुरक्षेसाठी सोमवारी सायंकाळपासूनच मुख्य प्रवेशद्वारावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

या बाबींवर कडक बंदी
विनापरवाना पार्ट्या : कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय आयोजित केलेल्या कार्यक्रमांवर बंदी
ध्वनिप्रदूषण : लाऊड स्पीकर, साउंड सिस्टीम आणि फटाक्यांच्या वापरावर पूर्णपणे रोख
लेझर शो आणि ड्रोन : एलईडी/रेझर लाइट आणि विनापरवाना ड्रोन शूटिंगला परवानगी नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आम्हाला, त्याची गरज होती, आम्ही आनंदी..."! पाकड्या अबरारला करारबद्ध करण्याचा SRH कडून बचाव; विसरले, भारताचा केलेला अपमान

LPG Crisis: गॅस टंचाईवर ८० लाख लिटर केरोसीनचा ‘बॅकअप’ प्लॅन तयार, काळाबाजारावर योगींची कारवाई

Pune-Bangalore Highway Accident : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; शिरोली पुलाजवळ, भरधाव मोटार बॅरिकेड्सला धडकली

Bike Accident: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Xiaomi 17 Price : भारतात लाँच झाला शाओमी 17 स्मार्टफोन; पाहा किंमत अन् दमदार फीचर्स..

SCROLL FOR NEXT